विश्वविजेत्या भारतीय कन्या! यापूर्वीच जर महिलांना संधी मिळाली असती तर त्यांनी असे यश पूर्वीच मिळवले असते. तसे पहिले तर भारतात सर्रास घरोघरी क्रिकेटचे वातावरण असतेच, निदान मुले काही झाले तरी क्रिकेट खेळायला जातातच जातात. आता त्यांच्या बरोबरीने मुलीही क्रिकेट खेळताना दिसतील आणि त्यांना आयपीएल सुरु झाल्यावर हक्काचे व्यासपीठ मिळेल. कनिष्ठ गटात भारतीय मुलींनी मिळवलेले हे यश म्हणजे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे कारण त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी मोठ्या संख्येने मुली पुढे येतील. --------------------------------- -------------------------------------- भा रतात क्रिकेट हा धर्मच झालेला आहे. त्यामुळे कोणतीही क्रिकेट मालिका असो की साधा गौरवनिधीचा सामना त्याला भरगच्च प्रतिसाद मिळाला नाही असे कधी होत नाही. वास्तविक पाहता जागतिक पातळीवर हाताच्या बोटावर मोजावे इतक्या देशात खेळला जाणारा क्रिकेट हा खेळ पण मागी...