कळू दे ज्याची त्याला औकात...

 टाळी एका हाताने वाजत नाही एका बलाढ्य राजकीय पक्षाने आपल्या धोरणाचा भाग म्हणा, घमेंड म्हणा, सत्तापिपासूपणा म्हणा  पण  अशा पोटनिवडणुकीत थेट आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवला आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मोडली म्हणण्यापेक्षा समंजसपणा दाखवला नाही .आता एकाने असे केले म्हटल्यावर  दुसरा संधी मिळताच  सोडेल असे होणे राजकारणात तरी शक्य नाही आणि त्यांनी तरी असे प्रत्येकवेळी आपले घोडे मागे का घ्यावे.. प्रत्येक  पक्षाला आपण विस्तार करावा आणि सत्ता काबीज करावी असे वाटले तर त्यात तो त्यांचा दोष नाही.
.............................................................................................................................
राजकारणात घमेंड नाही असे निदान आपल्या देशात तरी होणे शक्य दिसत नाही. एखादी पोटनिवडणूक असो कि प्रचार सभा असो, घमेंड दाखवल्याशिवाय राजकीय पुढारी  बोलला असे कधी होणार नाही . मागे वळून पाहिल्यास राजकीय पायंडे वेगळे होते, सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडायचे मात्र काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही याची अलिखित मर्यादा सर्वजण पाळत असत, आजकाल तसे दिसत नाही. टीका समजू शकतो पण त्याला शिव्यांची जोड आणि ते विशिष्ट आवाज टाकून वृत्तवाहिन्या पुन्हा पुन्हा प्रसारित करत असल्याने  वाईटसाईट बोलून सटकन प्रसिद्धी मिळवण्याचे एक आयते  साधन उपलब्ध होऊ  लागले आहे. हे  कधी थांबायचे तेव्हा थांबेल पण त्यातून आपण आपल्या राज्याची किंवा देशाची काय प्रतिमा निर्माण करत आहोत याचे भान राजकीय पुढार्यांना असायला हवे, कथित सभ्यपणाचा मुखवटा पांघरलेल्या मीडियालाही याची  जणी असायला हवी. 
हा सर्व पसारा मांडण्यामागे कारण हेच आहे की राज्यात होऊ  पोटनिवडणुका. उमेदवारांचे निधन झाल्यानंतरची पोटनिवडणूक बिनविरोध होत असे चित्र कालपरवापर्यंत होते . पण टाळी एका हाताने वाजत नाही एका बलाढ्य राजकीय पक्षाने आपल्या धोरणाचा भाग म्हणा, घमेंड म्हणा, सत्तापिपासूपणा म्हणा  पण  अशा पोटनिवडणुकीत थेट आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवला आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मोडली म्हणण्यापेक्षा समंजसपणा दाखवला नाही .आता एकाने असे केले म्हटल्यावर  दुसरा संधी मिळताच  सोडेल असे होणे राजकारणात तरी शक्य नाही आणि त्यांनी तरी असे प्रत्येकवेळी आपले घोडे मागे का घ्यावे.. प्रत्येक  पक्षाला आपण विस्तार करावा आणि सत्ता काबीज करावी असे वाटले तर त्यात तो त्यांचा दोष नाही आणि याच तत्त्वाप्रमाणे  पिंपरीत व कसब्यात होत असलेल्या पोटनिवडणुकीत आपण आपला उमेदवार द्यायचा असे ठाकरे गट , राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटले तर तो मोठा गहजब माजवण्याचा मुद्दा होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा महाविकास आघाडी  झाल्यानंतर त्यात समन्वय असावा आणि एका उमेदवाराच्या नावावर एकमत होऊन जर लढायचे तर प्रामाणिकपणे एक दुसर्याला साथ देऊन विजयापर्यंत पोचण्यासाठी...  आणि हे होत नसेल तर मग  नावाला आघाडी आणि प्रत्यक्षात निवडणुकीत कबड्डी असे पडद्याआडून डावपेच ;लढवण्यापेक्षा   स्वतंत्र  कधीही उत्तम , हे त्या  त्या पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे . 
राहता राहिला प्रश्न भाजपचा ... त्यांना निवडणूक बिनविरोध हवी आहे इतपत ठीक पण लटकेंच्या वेळी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेली खेळी जरा आठवावी म्हणजे तशीच हुक्की मविआच्या नेत्यांना अली तर त्यावरून त्यांना दोष देऊ नये , त्यापेक्षा निवडणूक रिगणात उतरून लोकशाहीचे जे कर्तव्य आहे ते पार पडावे...मतदार ठरवतील कुणाला निवडून द्याचे ते .....तुम्ही उगीच कशाला भांडताय, होऊन जाऊदे एकदा आणि कळूदे प्रत्येकाला जायची त्याची औकात. 











 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute