विश्वविजेत्या भारतीय कन्या!

 यापूर्वीच जर महिलांना संधी मिळाली असती तर त्यांनी असे यश पूर्वीच मिळवले असते. तसे पहिले तर भारतात सर्रास घरोघरी क्रिकेटचे वातावरण असतेच, निदान मुले काही झाले तरी क्रिकेट खेळायला जातातच जातात. आता त्यांच्या बरोबरीने मुलीही क्रिकेट  खेळताना दिसतील आणि त्यांना आयपीएल सुरु झाल्यावर हक्काचे व्यासपीठ मिळेल. कनिष्ठ गटात भारतीय  मुलींनी मिळवलेले हे यश म्हणजे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे कारण त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी मोठ्या  संख्येने मुली पुढे येतील.
---------------------------------                                              --------------------------------------


भारतात क्रिकेट हा धर्मच झालेला आहे. त्यामुळे कोणतीही क्रिकेट मालिका असो की साधा गौरवनिधीचा  सामना त्याला भरगच्च प्रतिसाद मिळाला नाही असे कधी होत नाही. वास्तविक पाहता जागतिक पातळीवर हाताच्या बोटावर मोजावे इतक्या देशात खेळला जाणारा क्रिकेट  हा खेळ पण मागील अनेक वर्षे भारतीयांना याची मोठी भुरळ  आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अत्याधुनिक सुविधा आल्या आणि नवनवीन दर्जेदार खेळाडूही  मोठ्या संख्येने पुढे येऊ लागले. त्या सारयाना  थेट अनुभवी  खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आजकालच्या लीगमध्ये मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मार्ग पूर्वीच्या तुलनेत आता कमी अवधीचा आणि झटपट पुढे जाण्याचा ठरताना दिसत आहे. पण हे सर्व होत असतानाच महिला क्रिकेटकडे भारतीय क्रिकेट बोर्डाने जरा लक्ष द्यावे अशी मागणी खूप वर्षांपासून होत होती.. सुरुवातीला आढेवेढे घेत आणि सुमार कामगिरी होते असे सांगत बोर्ड पुढाकार घेण्यास राजी नव्हते, ही  वस्तुस्थिती होती पण आताची काही वर्षे पहिली तर या भूमिकेत बदल झाला आणि महिला क्रिकेटला देशात पुरुषांच्या बरोबरीने दर्जा मिळाला.
आता तर महिलांचेही  आयपीएल होणार असून त्यासाठी पाच संघांच्या फ्रेंचाइझीची घोषणाही  झाली. यात  मुंबई, दिल्ली,बेंगलोर, लखनौ आणि अहमदाबाद संघांचा समावेश असून .या पाच संघांसाठी ४६६९. ९९ कोटी रुपये मिळाले आहेत. आता हे होत असतानाच मागील वर्षी आयसीसीने घोषित केलेली १९ वर्षांखालील टी २० क्रिकेट स्पर्धा नुकतीच द.आफ्रिकेत खेळली गेली आणि या पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय मुलींनी जेतेपद मिळवून देशाची मान उंचावली.
आयसीसीने ही स्पर्धा सुरु करण्याची घोषणा केल्यावर सुरुवातीला पात्रता फेरीचे सामने झाले आणि त्यातून बारा संघ पुढे आले. यातील अमेरिका हा एक सदस्य राष्ट्र असलेला संघ होता . आफ्रिकन वातावरणात भारतीय मुली कशी कामगिरी करतील आणि तेथील खेळपट्ट्या त्यांच्या खेळाला कितपत सूट होतील हा नेहमीप्रमाणे पडणारा प्रश्न होताच . सुरुवातीला मिडियानेही म्हणावी तितकी दखल घेतली नव्हतीच, पण आपल्या खेळाने भारतीय मुलींनी जगाचे लक्ष्य वेधून घेतले. एकिकडे  देशात 'पठाण' सिनेमाची चर्चा होत असताना त्याला ब्रेक लावण्याचे काम कनिष्ठ महिला संघाने करून दाखवले व रविवारी संध्याकाळी फायनलसाठी सारे क्रिकेटप्रेमी  टीव्हीसमोर जमा झाले.
 एकंदरीत हे सर्व पहिले तर असे लक्षात  येते की, यापूर्वीच जर महिलांना संधी मिळाली असती तर त्यांनी असे यश पूर्वीच मिळवले असते. तसे पहिले तर भारतात सर्रास घरोघरी क्रिकेटचे वातावरण असतेच, निदान मुले काही झाले तरी क्रिकेट खेळायला जातातच जातात. आता त्यांच्या बरोबरीने मुलीही क्रिकेट  खेळताना दिसतील आणि त्यांना आयपीएल सुरु झाल्यावर हक्काचे व्यासपीठ मिळेल. कनिष्ठ गटात भारतीय  मुलींनी मिळवलेले हे यश म्हणजे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे कारण त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी मोठ्या  संख्येने मुली पुढे येतील अशी अपेक्षा करता येते.
. मात्र असे असले तरी फक्त क्रिकेट हे एकच करून चालणार नाही. अन्य खेळातही आपल्याला खूप चांगली कामगिरी करून दाखवावी  आणि त्या खेळांना प्रेक्षकवर्ग कसा मिळेल आणि त्या क्रीडा स्पर्धांची संख्या देशाविदेशात कशी वाढेल हे पाहावे लागेल अर्थात या खेळाडूंना आर्थिक मदत व विदेशी प्रशिक्षण असे इतर कितीतरी मुद्दे आहेत तो आता चर्चेचा मुद्दा नाही पण या घडीला आनंदाची बाब हीच आहे की   भारतीय महिला क्रिकेटला न्यायही मिळाला आणि त्यांनी त्याचे सोनेही केले. या विश्वविजेत्या संघाचे मनापासून अभिनंदन!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute