Blog on H3N2

 बदलत्या ऋतुचक्रातील पीडा!

भारतात एनफ्लूएन्झा एच3एन2 विषाणूच्या तडाख्यात सापडल्याने हरियाणा व केरळमध्ये 2 रुग्ण दगावल्याची माहिती मिळाली आणि नीती आयोगाने मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसे पाहिले तर गर्दी किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरा असे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसावी पण त्याचप्रमाणे मास्क वापरला म्हणजे साथ टळली असे मानणेही चुकीचे आहे.  एनफ्लूएन्झाच्या ए प्रकाराविषयी आणि त्यात मूळ विषाणू आहे एच1एन1 आणि त्याचा उपप्रकार एच3एन2 हा आहे. त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण अशा प्रकारची साथ आपल्याकडे नेहमीच उद्भवते पण यावेळी ऑक्टोबरपासून अचानक पाऊस जाणे, त्यानंतर कमालीचा उकाडा होणे, मध्येच थंडी पडणे व ढगाळ हवामान होणे असे चमत्कारिक वातावरण होते. त्यामुळे या विषाणूला जोर धरण्यासाठी ते पोषक ठरले आणि सध्याची परिस्थिती उद्भवली.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जरा कुठे मोकळा श्वास घेण्यास नागरिकांनी सुरुवात केली तर त्यात एनफ्लूएन्झाच्या उपप्रकाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून कोरोनाच्या महामारीचा मुकाबला केल्यानंतरही आपण त्यातून काहीच धडा घेतलेला नाही हेच आता दिसून आले आहे. मुळात बदलते वातावरण आणि त्यानुसार शरीरावर होत असलेले परिणाम आणि वातावरणातील बदल स्वीकारताना शरीराच्या प्रतिकार शक्तीचा लागत असलेला कस या साऱ्यातून सर्दी व ताप यासारखे आजार बदलत्या ऋतूचक्रानुसार उद्भवत असतात.काहीवेळा सर्दीच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्याचे कामही केले जाते. हे सर्व काही आताचेच आहेत अशातला भाग नाही. पण असे असले तरी मग आताची जी खोकल्याची साथ आहे ती आटोक्यात येण्याऐवजी वाढतच जाताना का दिसते? असा सवाल उपस्थित होतो. त्याचे उत्तर शोधताना चार मुद्दे विचारात घ्यावे लागेल आणि त्याची सुरुवात कोरोनापासून करावी लागेल. कोरोनाच्या काळातील आरोग्यव्यवस्था, कोरोनानंतरच्या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मांडलेले मत, अमेरिकेच्या ऊर्जा खात्याचा अहवाल यातून सध्या सुरु असलेल्या एनफ्लूएन्झा एच3एन2 या विषाणु संसर्गाकडे पाहिल्यास त्याची भविष्यातील व्यापकता आणि त्याबाबत सध्या जे काही चिंताजनक सूर काढले जातात, त्यातील फालतूपणा आपल्या लक्षात येईल.
त्याआधी मुळात ही साथ काय आहे हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एनफ्लूएन्झाविषयी दीर्घ संशोधनानंतर व्यक्त केलेले मत असे आहे की, एनफ्लूएन्झात ए,बी,सी,डी असे चार प्रकार असतात. त्यातील बीमध्ये उपप्रकार नाहीत, सी दखल घेण्याइतपत गंभीर नाही आणि शेवटचा डी प्रकार हा प्राण्यात आढळतो असे सांगण्यात येते. मग प्रश्‍न पडतो एनफ्लूएन्झाच्या ए प्रकाराविषयी आणि त्यात मूळ विषाणू आहे एच1एन1 आणि त्याचा उपप्रकार एच3एन2 हा आहे. त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण अशा प्रकारची साथ आपल्याकडे नेहमीच उद्भवते पण यावेळी ऑक्टोबरपासून अचानक पाऊस जाणे, त्यानंतर कमालीचा उकाडा होणे, मध्येच थंडी पडणे व ढगाळ हवामान होणे असे चमत्कारिक वातावरण होते. त्यामुळे या विषाणूला जोर धरण्यासाठी ते पोषक ठरले आणि सध्याची परिस्थिती उद्भवली.
कोरोनाच्या महामारीचा मुकाबला केल्यानंतर आरोग्य प्रशासनाला पर्यायाने सरकारला भविष्यात यापुढेही दक्षता घ्याव्या लागणार, हा धडा मिळालेला असूनही एकंदरीत सुधारणेच्या दृष्टीने काहीच पाऊल पडलेले नाही. आपल्याकडे साथ आल्याशिवाय उपचारमोहीम व्यापक स्वरुपात हाती घेतलीच जात नाही आणि एकदा का साथ आटोक्यात आली की, ती पुन्हा येईल तेव्हा आपल्या यंत्रणांना जाग येते हे मोठे अपयश असल्याने अशा प्रकारच्या साथी शिरजोर होऊ पाहतात. त्यातच सर्वसामान्यांच्या अंगवळणी एक सवय पडलेली आहे, ती म्हणजे सर्दी किंवा ताप आल्यानंतर घरच्या घरी काढे पिणे किंवा इतर उपचार करून वेळ मारून नेण्यावर अधिक भर असतो. डॉक्टरकडे गेल्यास ते वारेमाप चाचण्या करायला सांगतील आणि नाहक खर्च वाढेल असा समज सामान्यांमध्ये मागील अनेक वर्षे रुढ आहे आणि तो पुर्णपणे चुकीचा आहे असेही म्हणता येत नाही. त्यातूनच मग खोकला किंवा कफासारखे आजार हे दीर्घकाळ टिकून शरीराच्या प्रतिकार क्षमतेवर त्याचा परिणाम होऊन नव्या आजारांना नकळत निमंत्रण मिळते. सध्या अशी अवस्था आहे, काही शहरांमधील हवामान इतके प्रदूषित झालेले आहे की, त्यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात असे तज्ज्ञमंडळी म्हणतात व त्यामुळे अशा प्रकारच्या विषाणूंना संसर्गासाठी नकळतपणे बळकटी मिळते. त्यातच काही कफ सिरप बनवणाऱ्या कंपन्यांवरसुद्धा सरकारकडून याचदरम्यान नेमकी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नेमके कोणते कफ सिरप योग्य? हा कळीचा मुद्दा ठरण्याची भीती आहेच.
भारतात एनफ्लूएन्झा एच3एन2 विषाणूच्या तडाख्यात सापडल्याने हरियाणा व केरळमध्ये 2 रुग्ण दगावल्याची माहिती मिळाली आणि नीती आयोगाने मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसे पाहिले तर गर्दी किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरा असे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसावी पण त्याचप्रमाणे मास्क वापरला म्हणजे साथ टळली असे मानणेही चुकीचे आहे. त्या जोडीने इतरही काही दक्षता घ्याव्या लागतात. जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा मास्क लावून बाहेर जायचे म्हटले तरी विशिष्ट अंतर चालल्यावर श्वसनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे मग मास्कचा अडथळा वाटू लागतो, यावर कोणतीही तज्ज्ञ मंडळी विचार करताना दिसत नाहीत. आता देशातील सर्वसामान्यांची ही कैफियत पाहिल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ओसरत असताना दिलेल्या काही इशाऱ्यांकडे पाहणे महत्त्वाचे ठरते. कोरोना कमी झाला असला तरी त्याच्या विषाणुचे उपप्रकार नव्याने उद्भवू शकतात हे त्यातील एक निरीक्षण अतिशय महत्त्वाचे असून ते आपल्या देशात किती गंभीरपणे घेण्यात आले हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधताना चीनमधील मांडलेली परिस्थिती महत्त्वाची असून एखाद्या विषाणूचा संसर्ग जसा झपाट्याने होतो तसा त्यात होणारा बदल आणि त्याला रोखण्यासाठी प्रतिकारक्षमता वाढवताना करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक लसींमुळे नवा उपप्रकार निर्माण होण्याची शक्यता हे सर्व विचार करण्यासारखे मुद्दे आहेत व त्यामुळेच चीनमध्ये जेव्हा कोरोना आटोक्यात आला तेव्हा त्यानंतर पुन्हा पुढील लाट उद्भवली तेव्हा तो मूळ विषाणूचा उपप्रकार असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा तशीच अवस्था चीनमध्ये असून लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे.
 विविध जागतिक संघटनांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केल्यानंतर इंडियन मेडिकल कौन्सिलने याबाबत आपले मत व्यक्त करताना दक्षता घेण्याचे देशवासियांना आवाहन केले इतपत ठीक, पण दुसरा मुद्दा असा आहे की, किरकोळ वाटणाऱ्या पण दरवर्षी पावसाळा गेल्यानंतर ऑक्टोबर हीटमध्ये हजेरी लावणाऱ्या या साथीवर प्रभावी औषध आणि वाढत्या प्रदूषणाचा अलिकडचा मुद्दा लक्षात घेता त्यातून नवा आजार नको म्हणून कितपत संशोधन झालेले आहे? याची माहिती समोर येणे आवश्‍यक आहे. वास्तविक एनफ्लूएन्झा घाबरून जाण्यासारखा आजार नाही, त्यावर उपाय आहेत पण प्रश्‍न असा आहे की, त्याच्या जोडीने येणारा सुका खोकला जाता जात नाही. सध्या सभोवती पाहिले तर नाक वर ओढताना आणि तेवढ्याच वेगाने खोकताना तर कुणी शिंकताना आढळत आहे. दोनेक वर्षे मागे गेल्यास असा खोकला किंवा शिंक आल्यास ऐकमेकांकडे संशयाने पाहिले जात होते तसे आता होत नाही ही जमेची बाजू. एनफ्लूएन्झा एच3एन2चा संसर्ग आता वाढत्या तापमानात पुर्वीच्या वेगाने होण्याची शक्यता तशी कमी आहे पण म्हणून दक्षता घ्यायची नाही हेसुद्धा चुकीचे आहे. मात्र सरकारने खासकरून केंद्राने एखाद्या साथीचा अंदाज घेऊन मगच टोकाच्या दक्षतेचे आदेश जारी करावेत. राज्य अशा आजारांचा प्राथमिक अवस्थेत मुकाबला करण्यास सक्षम आहेत हा विश्वास बाळगण्यास अडचण नसावी. उगीच गरजेपेक्षा जास्त ताकदीचे दक्षतेचे आदेश जारी करून व मिडियाला ते चढवून फुगवून दाखवण्याची सोय करून त्यातून काही साध्य होणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा जसा मिडियावरील विश्वास दिवसेंदिवस या अशा टीचभर घटनेच्या वीतभर बातम्यांमुळे उडू लागला आहे तसाच तो सरकारच्या यंत्रणेवरूनही उडू शकतो...ते होता नये! साथीचे आजार येत जात राहतील पण विश्वासार्हता महत्त्वाची. उगीच कुणी कुणाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. भारत हा विशाल देश आहे, तेथे एनफ्लूएन्झा एच3एन2 या आजाराने किती गेले, यापेक्षा इतर आजारांनी रोज किती दगावतात हे आकडेवारीसह सांगितले तर त्यातील फोलपणा पुढे येईल. सर्वसामान्य नागरिक नुकताच कोरोनातून सावरत असताना त्याला नाहक घाबरवण्याचे काम कुणी करू नये इतकीच माफक अपेक्षा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute