किती पंचे पंचवीस ?


 पहिलीच्या बालभारती पुस्तकात 'जगन घर बघ'पासून ते 'बबन हरीण धर'असे वाक्यांचे सचित्र पाठ असत. आजच्यासारखा वनविभाग आणि प्राणीमित्र तेव्हा इतके सजग नव्हते,नाहीतर हरीण धरायला सांगणा-याला आणि ते सांगकाम्यागत ऐकणा-या बबनवर गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहिले नसते. बालभारतीच्या शेवटच्या पानावर कावळा आणि चिमणीच्या घरट्याची कविता आताही आठवते.'कावळेदादा,कावळेदादा माझा घरटा पाहिलास बाबा? नाही ग बाई चिमु ताई तुझा घरटा कोण नेई? अशी सुरूवात होऊन मग कपिलामावशी,कोंबडी ताई यांना विचारून थकलेल्या चिमणीला पोपट आपल्या पिंजऱ्यात येण्याचे निमंत्रण देतो पण ते नाकारून चिमणी म्हणते,'जळो तुझा पिंजरा मेला...त्याचे नाव नको मला.राहीन मी घरट्याविना...चिमणी उडून गेली राना' अशी ही कविता होती. या कवितेतल्या चिमणीचे,कपिलामावशी आणि कोंबडीचे वंशज आजही दिसतात पण कावळेदादांचे वंशज मात्र पूर्वीसारखे  सापडत नाहीत, ही शोकांतिका झाली आहे.

चौथी आणि सातवीच्या परीक्षा झाल्या का?असे कुणीतरी विचारताना दिसले आणि मी बालपणात रमून गेलो.एकेकआठवण डोळे उघडून समोर उभी राहिली. माझ्या बालपणी पहिली ते तिसरी हा काळ तसा मजेचाच होता. पहलीतला पहिला दिवस आजही चांगला आठवतोय. मातीच्या भिंतीच्या खोलीत पाचवी ते सातवी वर्ग बसत.पहिली ते तिसरीचे वर्ग पत्र्याच्या छप्परात बसत.कौलारू रंगमंच वाटावा अशा थोड्या वरच्या इमारतीत चौथीचा वर्ग बसत असे. पहिली आणि चौथी यांची जबाबदारी राणे, गुरव आणि मांडवकर गरुजींकडे असायची.त्याकाळी वर्ग चालवण्यापेक्षा हाकारले जायचे.शेजारी चावडी, पण ते ग्रामपंचायतीचे ऑफिस होते.  पहिलीच्या बालभारती पुस्तकात 'जगन घर बघ'पासून ते 'बबन हरीण धर'असे वाक्यांचे सचित्र पाठ असत. आजच्यासारखा वनविभाग आणि प्राणीमित्र तेव्हा इतके सजग नव्हते,नाहीतर हरीण धरायला सांगणा-याला आणि ते सांगकाम्यागत ऐकणा-या बबनवर गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहिले नसते. बालभारतीच्या शेवटच्या पानावर कावळा आणि चिमणीच्या घरट्याची कविता आताही आठवते.'कावळेदादा,कावळेदादा माझा घरटा पाहिलास बाबा? नाही ग बाई चिमु ताई तुझा घरटा कोण नेई? अशी सुरूवात होऊन मग कपिलामावशी,कोंबडी ताई यांना विचारून थकलेल्या चिमणीला पोपट आपल्या पिंजऱ्यात येण्याचे निमंत्रण देतो पण ते नाकारून चिमणी म्हणते,'जळो तुझा पिंजरा मेला...त्याचे नाव नको मला.राहीन मी घरट्याविना...चिमणी उडून गेली राना' अशी ही कविता होती. या कवितेतल्या चिमणीचे,कपिलामावशी आणि कोंबडीचे वंशज आजही दिसतात पण कावळेदादांचे वंशज मात्र पूर्वीसारखे  सापडत नाहीत, ही शोकांतिका झाली आहे.
पहिलीच्या गणितात एकक आणि दशक व जोडीला दहापर्यंत पाढे असत.'गुरूजी खेळायला जायचे,असे कुणी साडेचारला विचारले तर खेळणे दूरच पण पाढे म्हणा असा आदेश निघायचा.त्याकाळी मुलांना शिक्षक बिनधास्त छडीने मारत असत आणि आपल्या मुलाला मारल्यावर बहुतांशी पालक त्या शिक्षकाला एवढे मानत आणि आपल्या मुलाला हिणवत की,घरी पालकांचा शब्द मोडायची हिंमत नव्हती.नाहीतर मग शाळेत हेच शिकवतात का?थांब तुझ्या मास्तरांना विचारतो अशी जवळपास धमकीच घरून मिळायची जेणेकरून ईडीला घाबरून कुणी नेत्याने भाजपची वाट धरावी,तशी विद्यार्थ्यांची अवस्था होत असे.
आता या सा-यात नवी पुस्तके,पाटी,खडू,लाकडी पट्टी आणि गरज असेल तरच ड्रेस व छत्री नवीन मिळत असे. पहिलीच्या वर्गात गाणे शिकण्याचा किंवा कविता म्हणण्याचा योग आमच्या नशिबी नव्हताच. मांडवकर गुरूजी,गावडे गुरूजी यांचा आवाज म्हणजे आवाजच असल्याने आणि एक पाढेतज्ज्ञ व दुसरे विज्ञानतज्ज्ञ असल्याने या मराठीच्या कवितेला चाल लावून त्या वर्गात म्हणायच्या इतपत लाड त्यांनी ठेवलेलेच नव्हते.मग दुसरीतल्या एखाद्या मुलाला बोलवून त्यावेळच्या चालीवर त्याने कविता म्हणून दाखवायची व पहिलीच्या वर्गाने ती त्याच्यामागून म्हणायचे,हा प्रघात सुरू झाला.तसेही वरच्या वर्गातील हुशार  मुले कनिष्ठ वर्गात  त्याकाळात अर्धशिक्षकाची भूमिका पार पाडत असत. फेब्रुवारीच्या शेवटी सकाळची शाळा असे आणि मग मेमध्ये सुट्टी  पडेपर्यंत ती तसेच सुरू असायची. पहिलीतल्या तोंडी परीक्षेचा असाच एक नमुना होता. किती पंचे पंचवीस? या प्रश्नावर मी पंच्याची किंमत साधारण किती असावी असा विचार करत असतानाच मांडवकर गुरूजींच्या शेजारी बसलेल्या गावडे गुरूजींच्या ते लक्षात आले की,कसे माहीत नाही पण त्यांनी मला पाचचा पाढा म्हणण्यास सांगितला आणि तो पूर्ण झाल्यावर मग त्यानी पाचपंचे किती? सातपंचे किती हे विचारले व मी उत्तर दिले आणि मला वाटले की,पंचवीस पंचांची किंमत किती असे ते विचारताहेत? हे मी सांगितले फक्त.. आणि मारकुटे म्हणून फेमस असलेले मांडवकर गुरूजी धन् नशीबा! म्हणून डोक्यावर हात मारून हसले. शाळेतील बालपणीच्या अशा खूप आठवणी घेऊन लवकरच पुन्हा भेटू👍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute