'प्रवास नको पण बस आवर!

पहिली गाडी बिघडली म्हणून दुस-या गाडीची वाट बघताना त्यावेळी ती बस आलीच नाही शेवटी दुपारी उन्हातून चालत घर गाठावे लागले.'प्रवास नको पण बस आवर 'अशी नवी म्हण त्यावेळीच सुचली होती. बरे प्रवासात  इतर सर्व नीट घडून आले तरी सीटवर तुमच्या शेजारी कोण बसेल आणि त्याला काय छंद असेल काही सांगता येत नाही.बससीटवर आणि ब्लॉकमध्ये रहायचे असेल तर पैसे देऊन जोडीला संयमही ठेवावा लागतो कारण तुमचा शेजारी कोण? हे ठरवण्याचा तेथे तुम्हाला अजिबात अधिकार नसतो.  

प्रवासाची  मला तशी मनापासून आवड पण तो झाला पुर्वीचा एक काळ. आता परिस्थिती अशी आहे की मी प्रवासापासूनच काय पण कारण नसताना कुणाकडे जाण्यापासूनही दूर राहतो. आता येथे एक स्पष्ट करावे लागेल की, आपल्या मनात कुणाविषयी आकस किंवा दुजाभाव नाही. मात्र आजवर आलेल्या अनुभवातून काही बंधने स्वतःच स्वतःवर लादली तर  ती फायदेशीर ठरतात म्हणण्यापेक्षा डोक्याला ताप होत नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी मला माझे काही संभाव्य शत्रू कितपत प्रबळ आहेत ते  शोधावे लागते.कारण काळ आणि वेळ कधी येईल याचा काही  नेम नसतो म्हणण्यापेक्षा ती येतेच आणि माझा प्रवास बाजूला राहून त्याचे ठिय्या आंदोलनात रूपांतर होते. आता या साऱ्यावर उपाय म्हणजे प्रवास टाळणे आणि घरी बसणे हे उत्तम. पण हा पर्याय स्वीकारताना मी कर्मदरिद्री आहे मला कृपया कुणी बोलावू नये असे कितीतरी वेळा समोरच्याला मी सांगण्याचा प्रयत्न  करतो पण तेही धड जमत नाही.मी प्रवासाला निघतोय असे कळले की समस्त उपद्रवी ग्रह जन्मकुंडलीतील एका उपद्रवी स्थानात असे काही घुसतात की त्यापुढे भिन्न विचारी राजकीय पक्षांची एकत्र आघाडी फिकी पडावी...  आणि त्याचवेळी भाग्य स्थानातील जे काही थोडेफार ग्रह असतात ते संपकरी कर्मचाऱ्यासारखे मध्येच  गायब होतात ते पुन्हा जेव्हा कधी उगवतील तेव्हा आपली अशी परिस्थिती असते की,ना घर का..ना घाट का...  मी  प्रवासाला बाहेर निघालो की एरवी ज्या मार्गावर शेकड्याने रोज रिक्षा धावतात तेथे प्रतीक्षा करून एकही रिक्षा न वेळेत  सापडणे या घटनेने सुरूवात होते. आता तप्त ऊन्हात  अशी झक्कास नांदी झाल्यावर पुढच्या प्रवासाचे नाटक वठले नाही तर नवलच... गावी जायचे असेल तर नेमका त्याचवेळी  बसला ड्रायव्हर नसल्याने बस रद्द किंवा लेट. त्यातही बस वेळेत सुटली तर मध्येच जावून पाटा पडणे किंवा ब्रेक डाऊन म्हणून बसने भर रस्त्यात फत्कल मारणे या घटना जोडीला आहेतच.मग अशावेळेस तिकीटाचे पैसे कोणताही वाद न घालता सरकार हवाली करून व एका हातात पिशवी धरून घाटी चढत घर गाठताना,'मार्गी हळूहळू चाला...आपले हृदय संभाळा' हे आठवले नाही तर नवलच. तसेही तिकीटावर कंडक्टरची सही घेऊन किंवा दुस-या गाडीपर्यंत थांबून काही फायदा नसतो,याचाही एक  अनुभव आहेच. चारेक वर्षापुर्वी असाच गणपतीला गावी निघालो होतो.आधीच बस लेट आणि बस सुटल्यावर पावसच्या पुढे एका गावच्या अरुंद रस्त्यात मध्येच रेशनधान्य घेऊन जाणारा ट्रक बिघडल्याने पुढे जाण्यास मार्गच नव्हता.शेवटी दोन तास तिथे काढावे लागले.तशीच एक घटना पहिली गाडी बिघडली म्हणून दुस-या गाडीची वाट बघताना घडलेली.त्यावेळी ती बस आलीच नाही शेवटी दुपारी उन्हातून चालत घर गाठावे लागले.'प्रवास नको पण बस आवर 'अशी नवी म्हण त्यावेळीच सुचली होती. बरे प्रवासात  इतर सर्व नीट घडून आले तरी सीटवर तुमच्या शेजारी कोण बसेल आणि त्याला काय छंद असेल काही सांगता येत नाही.बससीटवर आणि ब्लॉकमध्ये रहायचे असेल तर पैसे देऊन जोडीला संयमही ठेवावा लागतो कारण तुमचा शेजारी कोण? हे ठरवण्याचा तेथे तुम्हाला अजिबात अधिकार नसतो. बसमध्ये सीटवर माझ्या शेजारी गुटखा किंवा पानमसाला चघळून मी विंडोसीटला बसलोय याचे अजिबात भान न ठेवता पिचकारी उडवणारेच अधिक असतात.एका मागील सीटवरील महिलेने यावरून त्याला तर सुनावले होतेच पण माझ्या अंगी नसलेल्या गांधीवादावरही उगीचच बोट ठेवण्याचा प्रयत्न केला होता.काहीही विपरीत घडले नाही आणि माझा प्रवास सुखकर झाला हे ज्यादिवशी कधी मी अनुभवेन,त्या दिवशी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेऊन त्यावेळच्या सरकारला म्हणतील त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार  करायला मी तयार आहे पण तो योग  येईल असे वाटत नाही. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute