आपेशाचा धनी कामगार!

 

मुकेश अंबानीनी कर्मचाऱ्याला घर न देता, संस्था अडचणीत  (नसली तरीसुद्धा) कशी आहे आणि आपण असेच राहिलो तर मरून जावू .मनोजजी, आपल्याला जोर करावा लागेल असे मिळमिळीत राहून नाही चालणार.त्या एअर टेलने पुन्हा एअरमध्ये (हवेत)आपली टेल (शेपटी)हलवण्यास सुरूवात केलेय,ध्यानात येत नाही का तुमच्या?इकडे आमचे बंधुराज अडचणीत आहेत.पोरापोरींची लग्न करून दिली..मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये डब्यात चाललाय, आता पैसा पुरवायचा कुठे आणि आणायचा कुठून? रात्ररात्र झोप लागत नाही.आता मिसेसला बोललो, रोज बाजारात जावून भाजी आण आणि साधाच काय तो स्वयंपाक कर. आपल्याला आता स्वयंपाकी आणि घरकामगार ठेवण्याची चैन नाही परवडणार..मीसुद्धा व्यायाम म्हणून इतर कामे करत जाईन.कोणत्याही कामात कमीपणा नसतो, अशी रड लावण्याची गरज होती जेणेकरून देशातील इतर उद्योजकांना एक नवा डायलॉग मिळाला असता

मंदीच्या काळात पगारवाढ तर सोडाच पण कामगाराच्या पेकाटात लाथ घालून हाकलून देणारे जालीम मालक उदंड झालेले असतानाच,कामगारांमुळे आपली उद्योगसंस्था वाटचाल करतेय. त्यांचे योगदान नाकारता येत नाही,त्याबदल्यात आपण त्यांना देत असलेला पगार पुरेसा आहे का किंवा इतर सुविधा काय देतोय,ज्याचे कायद्यानुसार ते हक्कदार आहेत याचा विचार करणारा मालकवर्गसुद्धा आहे आणि प्रामाणिकपणाला ते दाद देतात अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा युगानुयुगे एखादी संस्था आपला लौकिक आणि यश  का टिकवून आहे याचे उत्तर आपल्याला आपसूकच मिळून जाते. मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक.नुकतेच त्यांनी आपल्या कंपनीतील जुनेजाणते कर्मचारी व सीईओच्या दर्जास पात्र असलेल्या मनोज मोदी यांना पंधराशे कोटी रूपयांचे घर गिफ्ट म्हणून दिले.आता कामगार प्रामाणिक किंवा बरीच वर्षे एका संस्थेत काम करत नसतील, ते मनापासून कष्ट करत नसतील अशातला भाग नाही पण अपेक्षा एकेका पायरीने वाढत जात असून आणि त्यात कामगार कमी कसा पडतो, त्याला आपण कामावर ठेवून कसे उपकृत केलेय असा सर्रास दृष्टिकोन मालक वर्गाचा राहिल्याने 'गरजवंतास अक्कल नसते',अशा अविर्भावात कामगार उदासीनतेने काम करतात आणि त्याचा परिणाम संस्थेच्या कामगिरीवर होतो. मुकेश अंबानींसह जवळपास सर्वच बडे उद्योजक हे जाणतात आणि तशा दृष्टिकोनातून नियमांची आखणी करत असतात.रिलायन्समध्ये सर्व समाधानी आहेत अशातला भाग नाही पण जे आहे ते परवडतेय असा तरी निदान दृष्टिकोन आहे.आता हे बडे उद्योजकही प्रमुख स्टाफची बैठक घेतात.मात्र बैठकीत काय बोलायचे आणि कशी रड लावायची हे त्यांना शिकण्याची या घडीला गरज आहे.त्यासाठी क्लास नसले तरी फेमस रडतकडत मंडळी देशाच्या त्या त्या भागात आहेत.स्टाफच्या बैठकीपूर्वी  भर एसीत दरवळेल इतपत डोक्याला बाम फासावा आणि स्टाफ समोर येताच नाक ओढून सू-सू करावे. विषयाला रडव्या आवाजात सुरूवात करावी व सांगावे,आता गळ्यापर्यंत पाणी आलेय...एवढी मंदी उभ्या जन्मात पाहिली नाही.काळ खूप कठिण आलाय हो...खर्च खूप वाढलाय आणि कुणाला काढायचे म्हणजे एखाद्याच्या पोटावर कसे मारणार?असे सांगून मग काहीकाळ शांतता....त्यानंतर मग कसे करायचे? हा, काहीही सूचना ऐकून घेण्याची सवय नसतानाही उगीचच आपला स्टाफला प्रश्न व त्यावर कोड्याचे उत्तर काय बरे असेल अशा विचारार्थी चेह-यात स्टाफ पुन्हा स्तब्ध.राहून राहून एखाद्याला उगीच आपली मनात शंका,मालक बैठक बोलावतात तेव्हा नेहमीच कशी मंदी येते? या मंदीला दुस-या घरी धुणीभांडी किंवा इतर काही कामे नाहीत का?कायम इकडे वक्रदृष्टी...चार बुका शिकली असती तर ठेवली असती मालकांनी कामाला पण ते करायचे सोडून सगळ्यावर वाईट नजर मेलीची. त्यातच या मंदीबाईंच्या कागाळ्या ऐकून स्टाफही कोडगा होतो,हे सांगण्याची गरज नसावी.  मुळात जगावर या मंदीबाईंची वक्रदृष्टी असताना मुकेशभाईनी कर्मचा-याला असे घर वैगेरे न देता, संस्था अडचणीत  (नसली तरीसुद्धा) कशी आहे आणि आपण असेच राहिलो तर मरून जावू .मनोजजी, आपल्याला जोर करावा लागेल असे मिळमिळीत राहून नाही चालणार.त्या एअर टेलने पुन्हा एअरमध्ये (हवेत)आपली टेल (शेपटी)हलवण्यास सुरूवात केलेय,ध्यानात येत नाही का तुमच्या?इकडे आमचे बंधुराज अडचणीत आहेत.पोरापोरींची लग्न करून दिली..मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये डब्यात चाललाय, आता पैसा पुरवायचा कुठे आणि आणायचा कुठून? रात्ररात्र झोप लागत नाही.आता मिसेसला बोललो, रोज बाजारात जावून भाजी आण आणि साधाच काय तो स्वयंपाक कर. आपल्याला आता स्वयंपाकी आणि घरकामगार ठेवण्याची चैन नाही परवडणार..मीसुद्धा व्यायाम म्हणून इतर कामे करत जाईन.कोणत्याही कामात कमीपणा नसतो, अशी रड लावण्याची गरज होती जेणेकरून देशातील इतर उद्योजकांना एक नवा डायलॉग मिळाला असता पण आता त्यांनी असे काही गिफ्ट देऊन ठेवलेय की या विषयावर दुसरे कोणी बोलणारही नाहीत आणि बोललेच तर आपले कामगार कसे  कामचुकार हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील.म्हणजेच इथूनतिथून अपयशाचा धनी कामगार आणि कामगारच! 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute