यथा राजा तथा प्रजा!


देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या या घडीला चिंता करावी इतपत वाढलेली नाही हे सत्य असले तरी या घटनेकडे मागील अनुभव पाहता जरा दक्षतेने सरकारबरोबरच जनतेनेही पहायला हवे आणि त्यामुळेच आपण देशवासियांनी मागील दोन कोरोना लाटांमध्ये काय भोगले याचे स्मरण करणे आवश्यक बनते.

संकटातून एकदा धडा मिळाला की त्याकडे अनुभवी नजरेतून पहायला हवे, पण ते संकट टळले की आपण त्यावर सुरेख मात कशी केली,आता आपल्याला सारे जमते आणि आम्ही सा-या जगात बुद्धिवंत अशी स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची सवय झाली की, प्रगती  जशी असंभव अगदी तसेच संकटाची तीव्रता कमी करण्यासाठीच्या यंत्रणाही पुन्हा फाजील आत्मविश्वासात दंग राहण्याची शक्यता अधिक उरते.थोडक्यात यथा राजा तथा प्रजा अशी अवस्था यालाच म्हणतात.या सा-या विवेचनावरून मागील दोन लाटेत देशातील कोट्यावधींना आपल्या तडाख्याने हैराण करणाऱ्या व लक्षावधींचे प्राण घेणाऱ्या कोरोनाने देशात पुन्हा हातपाय पसरण्यास सुरूवात केलेय यावर उजेड टाकण्याचा प्रयत्न असून घाबरण्यालायक  परिस्थिती सध्या दिसत नसली तरी पुन्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या या घडीला चिंता करावी इतपत वाढलेली नाही हे सत्य असले तरी या घटनेकडे मागील अनुभव पाहता जरा दक्षतेने सरकारबरोबरच जनतेनेही पहायला हवे आणि त्यामुळेच आपण देशवासियांनी मागील दोन कोरोना लाटांमध्ये काय भोगले याचे स्मरण करणे आवश्यक बनते.कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य खात्याबरोबरच सरकारकडेही धड अनुभव नसल्याने निर्णयक्षमतेबरोबरच साऱ्याच बाबतीत सैरभैर झाल्यासारखे होते तर दुस-या लाटेत साधनसामुग्रीची कमतरता हा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. आॅक्सीजनच्या तुटवड्यापायी अनेक जीव दगावले. कोरोनात जसे जीव दगावले तसेच अनेकांचे हातचे काम गेले,त्याच्या झळा आजही सर्वसामान्यांबरोबर  अर्थव्यवस्थाही भोगत आहे. कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी रुग्णांची प्रतिकार क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला.व्यापक लसीकरण मोहिमा पार पडून बूस्टरही देऊन झाला पण तरीही कोरोनाचे समूळ भय नष्ट झालेच नाही आणि म्हणून सध्या जी परिस्थिती देशात दिसतेय ती चिंता करण्यासारखी वाटत नसली तरी भविष्यात चिंता वाढवू शकते हा इशारा देणारी आहे हे साऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.कोरोना रुग्णावाढीचा मौसम लक्षात घेतला तर मार्च ते मे या कालावधीत रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने पुन्हा तशा प्रकारची भयावह साथ येईल की काय,ही झाली सामान्यजनास वाटणारी भीती. एकतर अशी भीती बाळगण्याचे कारण नाही पण दक्षता घेणेसुद्धा गरजेचे आहे. एखादा आजार वाढल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून दक्षता घेणे,याला म्हणतात वैद्यकीय सुज्ञपणा,तो सा-यानाच पसंत पडेल असे नाही पण आकड्यांचा अभ्यास करून लाटांचे सिद्धांत मांडत बघण्यापेक्षा व्यापक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला व्यापक शिस्तीची जोड द्यावी लागेल पण हे शिस्तीचे डोस नेहमी जनतेलाच का,वारेमाप सभा घेत फिरणारे नेते कोरोनाबाबत किती गंभीर आहेत याचा विचार व्हायला हवा. कुणी सभा घेऊच नयेत असे अजिबात म्हणायचे नसून त्यासाठी नेत्यांना काही मार्गदर्शक तत्वे का जारी केली जात नाहीत?आणि अशी तत्त्वे ते किती गंभीरपणे पाळतात हा खरा विचाराचा मुद्दा आहे. नियम सा-यानाच सारखे असावेत  हे विदेशी तत्व आपल्या देशात का लागू होत नाही?नेते वा मंत्रीगणाचे अनुकरण सामान्य करत असतात. ही जबाबदार मंडळी बेजबाबदार वागत असेल तर सर्वसामान्य माणूस शिस्तीत वागेल अशी अपेक्षा तरी कशी करता?हे असे सर्व चित्र असल्याने साऱ्यांनी वेळीच दक्षता घ्यावी,इतकाच माफक हेतू आहे. मागील काही महिने इन्फ्लुएंझासुद्धा जोर धरत होता आणि आता कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हाळ्यात जपून राहणे कधीही चांगलेच!  आता उन्हाळ्याच्या सुट्टया लागतील आणि मोठ्या प्रमाणात शहरी भागातून लोक गावात येतील,त्याबाबत नेमके काय धोरण ठेवण्यात येणार आहे.लसीकरण झाले म्हणजे सर्व  संपले असे मानणे कितपत योग्य,यावर आतापासूनच व्यापक  जनजागृतीची गरज असून त्यावर कुणीच काही बोलत नसून नुसती रोजची रुग्णसंख्या आणि चिंतेत वाढ हेच काय ते पालुपद ऐकायला मिळत आहे,त्यातून काय साध्य होणार,कुणास ठाऊक?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute