पोस्ट्स

आटपा हो झडकरी!

इमेज
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला  वृक्षारोपणाबाबत काही  सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. गडकरी हायवेचे काम 'झडकरी ' पूर्ण करतील अशी अपेक्षा वाटते ती फोल ठरू नये. मुंबई- गोवा महामार्गाचे काम या वर्षअखेरीस पुर्ण होऊन पुढील वर्षी जानेवारीत तो वाहतूकीसाठी पुर्णपणे खुला होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्याने त्यावर भरवसा ठेवण्यास अडचण नाही असे म्हणण्यास हरकत नाही कारण समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची पद्धत व कामाचा उरक वेळेत व्हावा यासाठी धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले मंत्री म्हणून गडकरींची देशभर ख्याती असून याबरोबरच अपयश स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवलेली असल्याने विरोधक त्यांच्यावर फार टीका करण्याचे टाळतात.रामनवमीच्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गाची हवाई  पाहणी करण्याबरोबरच सुमारे 15 हजार कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांची घोषणा ...

त्रिगुणात्मक पुरुषोत्तम!

इमेज
जन्मतःच कुणी कुणाचा अवतार म्हणून प्रसिद्धी पावत नाही तर समोर आलेल्या बिकट प्रसंगावर मात करून घडवलेल्या शौर्यातून अवतारी पुरूष म्हणून मान्यता मिळत असते.अशा महापुरुषांना धर्मबंधनात अडकवून न ठेवता ते समस्त मानव जातीला आदर्श कसे ठरतील हे पाहणे या घडीला महत्वाचे आहे. संयम,मर्यादा,जिद्द आदी त्रिगुणांशी आजन्म एकनिष्ठ राहून अतुलनीय पराक्रमाबरोबरच एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून लौकिक कमावून मानवी रूपातून देवत्वाला अवतारी पुरूष म्हणून पोचण्याचा प्रभू श्रीरामांचा प्रवास सोपा नसला तरी तो आजकाल असाध्य आहे,असे म्हणून दुर्लक्ष करण्याजोगाही नाही. आस्तिक आणि नास्तिक अशा दोन गटात श्रीरामांविषयी मतभिन्नता जरूर असू शकते कारण सरसकट पौराणिक व्यक्तीरेखेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले की,त्यावर विश्लेषण न करण्याची पळवाट आपसूकच उपलब्ध होते पण त्याचवेळेस संत महंत यांच्या अभंगात असलेल्या वर्णनाचे काय, यावर कुणी फारसा विचार करत नाही. श्रीराम हे मर्यादा पुरूषोत्तम ही झाली त्यांची पहिली ओळख पण क्षमाशील,सहिष्णु आणि समानतेचा पाया ठेवून आत्मपरीक्षण करणारा निधर्मी राजा,ही त्यांची पूर्ण ओळख.त्यामुळेच आयुष्यातील कोणत्य...

तुम्ही आम्ही का संतापतो?

इमेज
तुम्ही आम्ही का संतापतो? याचे विवेचन करताना उत्तर मिळून गेले की,आजकालच्या समाजात दंगेधोपे,हाणामारी करणे याला डॅशिंग म्हणण्याची वाढती राजकीय रीत व विचारी,विवेकी आणि अभ्यासू असणे म्हणजे बुळचटपणा असा समज रूढ होत चालला असून लहान पोरे वडीलधारी माणसावर खेकसू लागली की त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले,असे समजणारे पालक कमी नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणत सुजाण आततायी वर्तनाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात.पण असे दुर्लक्ष करण्याचा दुसरा अर्थ, समोरचा आपल्याला घाबरतो असा घेऊन आततायीपणा वाढतो आणि मग जशास तसे प्रत्युत्तर देण्याची वेळ येते,त्यातून काहीतरी अघटित घडून मग कायदेशीर यंत्रणा कामाला लागतात. अलिकडे हे प्रकार वाढतच चालले असल्याने या  सा-याचे मूळ असलेल्या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे असून,तुम्ही आम्ही का संतापतो? एरव्ही शांत वाटणारे चेहरे जमदग्नीचा अवतार का धारण करतात?हा विचार करण्यासारखा मुद्दा असून त्याकडे आरोग्य, सभोवतालची परिस्थिती आणि जन्मजात असलेले अवगुण अशा तिहेरी दृष्टिकोनातून पाहिल्यास सविस्तर विवेचन करता येते. मूल जन्माला येते तेव्हापासून ते पूर्णपणे दुष्ट किंवा सुष्टही नसते. त...

स्वार्थी जातीचे लोक!

स्वार्थी जातीचे लोक! प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेणे हा अपराध नाही तर त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो,तेव्हा पुर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलो ते दिवस आणि अशा संकटात कुणी असेल तर त्याला होईल तेवढी मदत करण्यास अजिबात विसरता कामा नये. एकदा पैशाची भूक वाढली की गरजा वाढतात आणि त्या पुर्ण करण्याच्या नादात माणसे स्वार्थी व आत्मकेंद्रित बनतात.ज्या मुलाला दोन रुपयाची गरज होती,त्याला ते दिले गेले असते तर त्याचा चांगुलपणावर विश्वास बसला असता पण त्याऐवजी त्याला हडतुड करण्यात आल्याने तो चोरीच्या मार्गाला वळला.                     ..................... विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील प्रेत  खांद्यावर टाकून तो शांतपणे स्मशानातून चालू लागला.इतक्यात त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला की,राजा तुझ्या स्वार्थासाठी तू हे असे उद्योग करत आहेस पण त्यामुळे तू अप्पलपोटा ठरण्याची शक्यता अधिक दिसते आणि एकदा ही सवय जडली की,तुझ्यातील माणुसकी पुर्णपणे मरून जाईल.अशाच एका माणसाची कथा तुला आज ऐकवतो. भाग्येश नाव...

अधिवेशन काय कामाचे?

इमेज
संसद असो की विधिमंडळ तेथे इतका गोंधळ आणि बेशिस्त दिसते की,बालवाडीत जाणारी मुले त्यापेक्षा कितीतरी शिस्तबद्ध आणि विचारशक्तीचे वय नसतानाही काहीतरी करण्याचे ध्येय ठेवून असल्यागत वर्गात येतात.दुस-याचे अनुकरण करून रडणारे मूलही हौसेने बालवाडीत जाऊ लागते.अधिवेशन युगानुयुगे चालत आलेले आहे पण तेव्हाच्या अभ्यासू आणि विद्वान सदस्यांचे किंवा मंत्र्याचे अनुकरण विद्यमान सत्ताधारी,विरोधक कुणीच करताना दिसत नाही, त्यामुळे बदलच होणार नसेल तर असे अधिवेशन काय कामाचे?असा प्रश्न सामान्यजनास पडतो आणि त्याचे उत्तर कुणाकडेच नाही. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकदाचे संपले.  जवळपास महिनाभर चाललेल्या या अधिवेशनाचे बरेचसे कामकाजाचे तास वाया गेले आणि फक्त 17 विधेयके मंजूर झाली.आता कामकाजाचे तास वाया जाण्यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकाकडे बोट दाखवतील तो भाग निराळा पण अधिवेशनात महागाई,रस्ते,पाणी,वीज,शेतकरी आत्महत्या,अवकाळी पावसाचे वाढते संकट हे मुद्दे घेऊन फक्त विरोधकांनी सभात्याग करायचा व सत्ताधाऱ्यांनी मोघम उत्तर द्यायचे, हा मागील बऱ्याच वर्षापासून चालत आलेला  सोयीस्कर खेळ यावेळेसही पहावयास मिळाला. अर...

Political blog

इमेज
  कारभारी दमानं.... राहुल गांधी यांच्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना त्याचा अवलंब करायचे सोडून पक्षजनांचे आंदोलन कशासाठी?असा प्रश्न असून काँग्रेससारख्या विचाराने चालणाऱ्या पक्षाला यातून राजकीय लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. कपिल सिब्बल, सिंघवी असे कायदेपंडीत सोबत असताना ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणे अधिक योग्य ठरू शकते. निवडणूका दृष्टीपथात असताना पक्षाला पूर्णवेळ वाहून घेऊन पक्षबांधणी करण्याचे सोडून भारत जोडो यात्रा करून थकलेले  सदगृहस्थ राहुल गांधी काही बदलायचे  नाव काढत नाहीत.देशाला काँग्रेसची गरज असताना आपले विचार आणि सरकारचे अपयश व जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य अविरतपणे करण्याचे सोडून फक्त घराणेशाही टाळली असे कागदोपत्री दाखवून मल्लिकार्जुन खरगेंच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून राहुल गांधी नसते उपद्व्याप करतानाच अधिक दिसत आहेत. दिल्लीतले दोन शक्तीशाली नेते आणि राहुल गांधी यांनी एकमेकांना मोठे करण्याची सुपारी घेतलेय की कसे, काही कळत नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की,त्यांची कबर खोदण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे...आता एखाद्या हिंदुत्ववादी नेत्...

Blog on MNS

इमेज
  संघर्षाची सतरा वर्षे!  पक्ष कोणताही असो,त्याला आपल्याला सत्ता मिळावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे पण त्या मार्गाने वाटचाल करताना  उत्तम वक्तृत्व शैलीबरोबरच उपलब्ध संधी,गरजेनुसार तडजोड आणि आकड्यांचे गणित यातही पारंगत असणे आवश्यक असते.सामान्यजन याला लबाडी म्हणतात तर राजकीय भाषेत त्याला चतुराई म्हणतात. राज यांच्यासारख्या परखड नेत्याला हे जमेल का? हे महत्त्वाचे आहे. मा झे स्वतःचे काहीतरी आहे, मी स्वतः काहीतरी निर्माण केले आणि मी कुणाच्या पुण्याईवर जगत नाही हे सांगताना वाटणारा अभिमान त्या व्यक्तीच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केली तरी थोड्याबहुत प्रमाणात जाणवतो.राज ठाकरे यांची मनसे आता सतरा वर्षांची झाली, हा सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण संघर्षातच गेला. संघर्षाशिवाय सत्ता मिळत नाही आणि जनतेच्या समस्या आंदोलनाशिवाय सुटत नाहीत पण नुसती आंदोलने करत राहण्यासाठी पक्षाचा जन्म कुणालाच परवडणारा नाही. शिवाय कार्यकर्ते तरी किती केसेस अंगावर झेलतील? हा प्रश्न असतो.अशावेळेस पक्षाच्या मुख्य  नेत्यालाच आपली पुढची दिशा ठरवावी लागते. हे लक्षात घेता सध्याची राजकीय परिस्थिती मनसेला अनुकूल आ...