पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपेशाचा धनी कामगार!

इमेज
  मुकेश अंबानीनी कर्मचाऱ्याला घर न देता, संस्था अडचणीत  (नसली तरीसुद्धा) कशी आहे आणि आपण असेच राहिलो तर मरून जावू .मनोजजी, आपल्याला जोर करावा लागेल असे मिळमिळीत राहून नाही चालणार.त्या एअर टेलने पुन्हा एअरमध्ये (हवेत)आपली टेल (शेपटी)हलवण्यास सुरूवात केलेय,ध्यानात येत नाही का तुमच्या?इकडे आमचे बंधुराज अडचणीत आहेत.पोरापोरींची लग्न करून दिली..मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये डब्यात चाललाय, आता पैसा पुरवायचा कुठे आणि आणायचा कुठून? रात्ररात्र झोप लागत नाही.आता मिसेसला बोललो, रोज बाजारात जावून भाजी आण आणि साधाच काय तो स्वयंपाक कर. आपल्याला आता स्वयंपाकी आणि घरकामगार ठेवण्याची चैन नाही परवडणार..मीसुद्धा व्यायाम म्हणून इतर कामे करत जाईन.कोणत्याही कामात कमीपणा नसतो, अशी रड लावण्याची गरज होती जेणेकरून देशातील इतर उद्योजकांना एक नवा डायलॉग मिळाला असता मंदीच्या काळात पगारवाढ तर सोडाच पण कामगाराच्या पेकाटात लाथ घालून हाकलून देणारे जालीम मालक उदंड झालेले असतानाच,कामगारांमुळे आपली उद्योगसंस्था वाटचाल करतेय. त्यांचे योगदान नाकारता येत नाही,त्याबदल्यात आपण त्यांना देत असलेला पगार पुरेसा आहे का किंवा इतर सुविध

भगवंताची पन्नाशी!

इमेज
  सचिन तेंडुलकरचे महानपण त्याच्या खेळाइतकेच विनम्रतेतही दडलेले आहे.तसे क्रिकेटमध्ये खूप खेळाडू त्यांच्या सुरेख खेळासाठी प्रसिद्ध होते पण  डाव रंगलेला असताना मध्येच नव्वदीत बाद होणे भलेही तो उतावीळपणाचा का एक भाग असेना पण सचिनला सहानुभुतीच देऊन गेला.पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद ठरवणे आणि सचिनने गुमान निघून जाणे,अशावेळेस चाहते मैदानाबाहेरून त्या पंचाला कडकडून शिव्या देत असत. समर्पण,जिद्द,कौशल्य आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठीची धडपड,मेहनतीची तयारी असलेला सामान्य कुटुंबातील माणूसही  त्याने निवडलेल्या क्षेत्रात  उच्च स्थानी पोचून  जितीजागती  दंतकथा ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण  म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर.सत्तरीच्या दशकात गरीबी हटावच्या घोषणा देशात दिल्या जात होत्या.त्या काळात जन्मलेले हे बालक गो-या साहेबाच्या क्रिकेटमध्ये त्यांच्याही कितीतरी वरच्यास्थानी पोचेल असे त्यावेळी कुणीच गृहीत धरले नव्हते. क्रिकेटचा भगवंत असलेला सचिन तेंडुलकर आता पन्नाशीचा झाला. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण तीन टप्प्यांत करावे लागेल.बालकांड,मैदानकांड आणि आता सुरू असलेले किचनकांड असे त्याचे टप्पे कर

'प्रवास नको पण बस आवर!

इमेज
पहिली गाडी बिघडली म्हणून दुस-या गाडीची वाट बघताना त्यावेळी ती बस आलीच नाही शेवटी दुपारी उन्हातून चालत घर गाठावे लागले.'प्रवास नको पण बस आवर 'अशी नवी म्हण त्यावेळीच सुचली होती.  बरे प्रवासात  इतर सर्व नीट घडून आले तरी सीटवर तुमच्या शेजारी कोण बसेल आणि त्याला काय छंद असेल काही सांगता येत नाही.बससीटवर आणि ब्लॉकमध्ये रहायचे असेल तर पैसे देऊन जोडीला संयमही ठेवावा लागतो कारण तुमचा शेजारी कोण? हे ठरवण्याचा तेथे तुम्हाला अजिबात अधिकार नसतो.    प्रवासाची  मला तशी मनापासून आवड पण तो झाला पुर्वीचा एक काळ. आता परिस्थिती अशी आहे की मी  प्रवासापासूनच काय पण कारण नसताना कुणाकडे जाण्यापासूनही दूर राहतो. आता येथे एक स्पष्ट करावे लागेल की, आपल्या मनात कुणाविषयी आकस किंवा दुजाभाव नाही. मात्र आजवर आलेल्या अनुभवातून काही बंधने स्वतःच स्वतःवर लादली तर  ती फायदेशीर ठरतात म्हणण्यापेक्षा डोक्याला ताप होत नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी मला माझे काही संभाव्य शत्रू कितपत प्रबळ आहेत ते  शोधावे लागते.कारण काळ आणि वेळ कधी येईल याचा काही  नेम नसतो म्हणण्यापेक्षा ती येतेच आणि माझा प्रवास बाजूला राहून त्याचे ठिय

असुनि डोळे आम्ही आंधळे

इमेज
  माझ्या खिशात इंदिराजींच्या काँग्रेसचा हात आणि जनता पार्टीचा नांगरधारी शेतकरी असे दोन परस्पर विरोधी पक्षाचे बिल्ले एकत्र नांदत होते. तसे ते मतदान केंद्रावर क्षम्य नव्हते पण ते बिल्ले काढले असते तर मी आणखी जोरात रडलो असतो हे आधीच समजून पोलिसाने त्याला महत्व दिले नाही. राजकारण आणि निवडणुका याचा उबग आजकाल सामान्यांना  येत असतो हे जरी खरी असले तरी १९८०-९० च्या दशकात निवडणूका कशा असायच्या आणि त्यावेळी काय केले जायचे हे सर्व राजकारण बाजूला ठेऊन जाणून घेण्यास काही हरकत  नसावी असे वाटते. ८० ते ९० च्या दशकातील राजकारण हे वैचारिकतेवर अधिक चालत असे. आपल्या विरोधी पक्षाच्या धोरणावर टीका करून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण  करत असत. आजच्यासारखी व्यक्तिगत टीका किंवा कुणाची बदनामी त्याकाळात होत नसे. मुळात निवडणूकांची संख्या तशी मर्यादित आणि प्रचार सभाही मर्यादित होत्या.नाही म्हणायला लाऊडस्पीकरवरून गावात फिरता प्रचार केला जात असे.या घडीला राजकारणाचा जरी तिटकारा वाटत असला तरी बालपणी निवडणूका आल्या की,बरे वाटत असे. त्याला कारण होते ते म्हणजे विविध पक्षांचे बिल्ले आणि पोस्टर्स मिळत असत. त

घड्याळबाबा

इमेज
  काॅलेजमध्ये तास सुरू असताना मागील बेंचवरून या घडयाळातून टारगट विद्यार्थी आवाज काढत आणि वर्गभर हशा पिकल्यावर शिकवण्यात तल्लीन असलेल्या शिक्षकाचा पारा चढत असे पण हे घड्याळ खिशात दडवले जात असल्याने ते सापडत नसे. वेळेशिवाय घड्याळांचा असाही उपयोग करता येतो, हे विद्यार्थ्यांशिवाय दुसरे कुणालाच उमगणे शक्य नाही.आता मोबाईल आले आणि त्यात घड्याळ व तारीख दिसू लागले,त्यामुळे घड्याळबाबा जरा मागे पडल्यासारखे झालेत पण तरीही घराची भिंत आणि माणसाचा हात याला घड्याळाशिवाय शोभा नाही.शिवाय पुर्वीच्या बालभारतीच्या पुस्तकात उल्लेख  केल्याप्रमाणे त्यांचे काम आजही तेच आहे. घड्याळबाबा हे तसे बालपणापासूनचे म्हटले तर जुने सोबती पण आमच्या घरात यायला त्यांना तसा उशिरच झाला. मात्र १९८० च्या काळात घड्याळ भिंतीवर किंवा हातात नसले म्हणून वेळ कळणार नाही अशी काही कुणाची फार पंचाईत झालेली नव्हती. माणसाने गरजा मर्यादित ठेवल्या म्हणजे असे काही कुणाचे कुणावाचून  अडत नाही.पहिलीत असताना हे घड्याळबाबा बालभारतीत अवतरले पण ते हाती यायला नववी उजाडली. या घड्याळाचे कोणत्याही पक्षाची निशाणी नसल्यापासून खूप मोठे आकर्षण वाटत असे. तसेह

पाण्यासाठी दाहीदिशा!

इमेज
बोरकर बाव ही जलदायिनी दुसरी  गं गाच.अनेकांचे सुकलेले कंठ तिने ओले केले.दमदार झरे असल्याने पंप लावून विहीर कोरडी झाली तरी ती अर्ध्या तासात पुन्हा भरत असे.१४ एप्रिलला बाबासाहेबांच्या ग्रामपंचायतीत असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यायचे. कार्यक्रम आटोपला की ते सर्वजण बोरकर बावीवर पाणी पिण्यासाठी  येत.तेथे पाणी पिऊन ते घरची वाट धरत असत. अशा प्रकारे समानतेचे प्रतिक असलेली बोरकर बाव तहानलेल्यासाठी ख-या अर्थाने गंगामाई होऊन उभी रहायची आणि अजून रहात आहे. 'अन्नासाठी दाहीदिशा....आम्हा फिरविशी जगदीशा' हे जरी कुणी फार वर्षापूर्वी लिहून ठेवले असले तरी त्यात थोडा बदल करून 'पाण्यासाठी दाहीदिशा 'वैगेरे बदल केले म्हणून काही बिघडेल असे वाटत नाही. राज्यात पाणीटंचाईला आयुष्यात एकदाही सामोरा गेलोच नाही असा अनुभव असलेला कदाचित जन्माला येताना तोंडात सोन्याचांदीच्या चमच्यातून   सप्तनद्यांचे गोड पाणीच घेऊन आलेला असायला हवा.कारण पाऊस कितीही पडला तरी मार्चपासून पाणी गायब हे चित्र राज्याच्या अनेक भागात  काही आताचे आहे असे नव्हे.गावागावातले पाणवठ

किती पंचे पंचवीस ?

इमेज
 पहिलीच्या बालभारती पुस्तकात 'जगन घर बघ'पासून ते 'बबन हरीण धर'असे वाक्यांचे सचित्र पाठ असत. आजच्यासारखा वनविभाग आणि प्राणीमित्र तेव्हा इतके सजग नव्हते,नाहीतर हरीण धरायला सांगणा-याला आणि ते सांगकाम्यागत ऐकणा-या बबनवर गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहिले नसते. बालभारतीच्या शेवटच्या पानावर कावळा आणि चिमणीच्या घरट्याची कविता आताही आठवते.'कावळेदादा,कावळेदादा माझा घरटा पाहिलास बाबा? नाही ग बाई चिमु ताई तुझा घरटा कोण नेई? अशी सुरूवात होऊन मग कपिलामावशी,कोंबडी ताई यांना विचारून थकलेल्या चिमणीला पोपट आपल्या पिंजऱ्यात येण्याचे निमंत्रण देतो पण ते नाकारून चिमणी म्हणते,'जळो तुझा पिंजरा मेला...त्याचे नाव नको मला.राहीन मी घरट्याविना...चिमणी उडून गेली राना' अशी ही कविता होती. या कवितेतल्या चिमणीचे,कपिलामावशी आणि कोंबडीचे वंशज आजही दिसतात पण कावळेदादांचे वंशज मात्र पूर्वीसारखे  सापडत नाहीत, ही शोकांतिका झाली आहे. चौथी आणि सातवीच्या परीक्षा झाल्या का?असे कुणीतरी विचारताना दिसले आणि मी बालपणात रमून गेलो.एकेकआठवण डोळे उघडून समोर उभी राहिली. माझ्या बालपणी पहिली ते तिसरी हा काळ

पाणउताऱ्याची नांदी !

इमेज
चीनला युद्धाची खुमखुमी आहेच पण त्याचवेळेस युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचे वाजलेले तीनतेरा पाहून चीनने आपला पवित्रा बदलला. अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट असल्याने चीनला फक्त अशा कुरघोडी करण्यावर समाधान मानावे लागत आहे. आता चीन हे का करतोय,त्याचे उत्तर साधेसरळ असून भारताचे वाढते प्राबल्य रोखण्यासाठी त्या देशाचे लक्ष विचलित करणे आणि स्वतःच्या देशातील जनतेला ठाऊक असलेले जीनपिंग यांचे अपयश विसरावे, यासाठी असे राष्ट्रवादाचे  बुजगावणे उभे करावे लागते नामकरण विधी हा एक भारतीय संस्कृतीतला मानाचा,उत्साहाचा आणि एखादी संस्थाच असेल तर अभिमानाचा सोहळा असेल पण जे आपले नाही त्याचे नामकरण करण्याचा घाट घालणा-याला 'शी' नाहीतर दुसरे काय म्हणायचे ते आता तुम्हीच सांगा बरे. इतक्या चांगल्या सुरूवातीनंतर ही चर्चा अरुणाचल प्रदेशमधील अकरा गावांचे नामकरण करण्याचा घाट घालणाऱ्या घटनेकडे वळतेय हे अपेक्षित नसले तरी ते मान्य करण्यास काही हरकत नाही.चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि अवघे विश्व म्हणजे चीनच असे समजणारे शी जिनपिंग यांच्यावर आणि त्यांच्या राष्ट्रावर  जगाने इतका अन्याय केल्याची त्यांची भावना आहे की,स्वतःकडील गतव

फडतूस म्हणाले काडतुसला!

इमेज
कोण्या एका जमान्यात पुस्तके, पेन, फाईल्स वैगेरे घेऊन राजकीय नेते दिसायचे. नाही म्हणायला, शरद पवार यांच्याकडे या वयातही हे सर्व दिसते पण बाकी या जमान्यातील मंत्रीमहोदय किंवा नेते यांच्याकडे असे काही दिसत नाही. इतकी सर्व माहिती डोक्यात ठेवण्याइतपत ते हुशार आहेत की कसे ते माहित नाही पण जमाना बदलला आहे एवढे नक्की. आता त्यात आणखी पुढे जाऊन कुणाच्या हाती काडतुस दिसू लागले तर? आणि ते फडतुस म्हणून आणखी कुणाच्या हाती बॉम्ब दिसू लागला तर?... कदाचित ही कल्पना येथे मुर्खपणाची वाटेलही पण ही कल्पनाशक्ती घेऊन एक सुरेख विनोदी नाटक मराठी रंगमंचावर येण्यास हरकत नाही . राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असतानाच राजकीय वातावरण तापले नाही तर नवलच. तसे पाहिले तर राज्यातील राजकीय नेत्यांइतकी सविस्तरपणे बोलण्यासाठीची उसंत इतर कुणाच्याच नशीबी नसेल.त्यामुळे त्यांना रोज काहीतरी नवनवीन सुचत असते. कधी कुणी पक्षी वा प्राण्यांचे आवाज काढतो तर कधी कुणी कुणाच्या नकला करतो, कधी कुणी कुणावर आरोप करतो आणि इतके करूनही पोट भरत नाही म्हणून कुणी कुणाला शिव्या देतो व त्याहीपुढे जावून आता जबाबदार नेतेमंडळी फडतूस आणि काडतुसच्य

यथा राजा तथा प्रजा!

इमेज
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या या घडीला चिंता करावी इतपत वाढलेली नाही हे सत्य असले तरी या घटनेकडे मागील अनुभव पाहता जरा दक्षतेने सरकारबरोबरच जनतेनेही पहायला हवे आणि त्यामुळेच आपण देशवासियांनी मागील दोन कोरोना लाटांमध्ये काय भोगले याचे स्मरण करणे आवश्यक बनते. संकटातून एकदा धडा मिळाला की त्याकडे अनुभवी नजरेतून पहायला हवे, पण ते संकट टळले की आपण त्यावर सुरेख मात कशी केली,आता आपल्याला सारे जमते आणि आम्ही सा-या जगात बुद्धिवंत अशी स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची सवय झाली की, प्रगती  जशी असंभव अगदी तसेच संकटाची तीव्रता कमी करण्यासाठीच्या यंत्रणाही पुन्हा फाजील आत्मविश्वासात दंग राहण्याची शक्यता अधिक उरते.थोडक्यात यथा राजा तथा प्रजा अशी अवस्था यालाच म्हणतात.या सा-या विवेचनावरून मागील दोन लाटेत देशातील कोट्यावधींना आपल्या तडाख्याने हैराण करणाऱ्या व लक्षावधींचे प्राण घेणाऱ्या कोरोनाने देशात पुन्हा हातपाय पसरण्यास सुरूवात केलेय यावर उजेड टाकण्याचा प्रयत्न असून घाबरण्यालायक  परिस्थिती सध्या दिसत नसली तरी पुन्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या या घडीला च

आहे ते झाले थोडे....

इमेज
गुन्हेगार टोकाचा गुन्हा करतो,पुरावे नष्ट करतो, क्रूरतेची हद्द ओलांडून मोकळा होतो मग अशा गुन्हेगाराला त्याच पद्धतीने तडफडून मरण देणारी सजा दिली गेली तर तो त्याचा अमानुष छळ कसा आणि हे सर्व आताच इतक्या वर्षानंतर घटनाबाह्य वा अमानुष कसे काय वाटू लागले.देशात आजवर स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक कायदेपंडीत,विचारवंत आणि मानवतावादी उदयास आले पण या विषयावर त्यांनी काथ्याकूट केला नाही याचे कारण फाशीची सजा गुन्हेगाराला कोर्ट कधी देते,हे या साऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते तसेच अमानुषतेला मिळणारी सजा त्याच पद्धतीची ठेवली म्हणून लोकशाहीची राजेशाही होण्याची सुतराम शक्यता नाही  गुन्हेगारी कृत्य क्रूरपणा किंवा विकॄतीशिवाय पूर्ण होत नाही.अर्थात प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप वेगळे असले तरी हे प्रकार समाजविघातक आहेत हा त्यातला मुळ मुद्दा असून अशी कृत्ये रोखण्यासाठी वचक ठेवणारा कायदा आणि विनाहस्तक्षेप तपास करणाऱ्या प्रभावी यंत्रणा तसेच खटला सुरू झाल्यावर समोर येणारे पुरावे आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आखून दिलेली शिक्षा वेळेत सुनावणी करून ठोठावली जाणे अपेक्षित असते. अशावेळेस गुन्हेगाराला सजा भोगताना किती वेदना

मोठ्याचे काम मोठे!

अक्कलशून्य जसा आपल्याला अविचारी वाटतो तसा त्याच्याकडे असलेला सर्वाना   समान वागणूक देण्याचा गुण आपल्याला दिसत नाही. प्राणी अक्कलशून्य वाटले तरी ते म्हणूनच यशस्वी मायबाप ठरतात जे एकमेकांना त्रास देत नाहीत. मोठ्याने  वनवास स्वीकारला कारण तो आपल्या आईवडिलांना ओळखत होता.पण ज्याला आपले पहिले अपत्य म्हणून जन्म दिला ते अपत्य समाजाला कळले मात्र त्याच्या आईवडिलांना ओळखता आले नाही,हे नवल! विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.नेहमीप्रमाणे झाडावरील प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानातून मंद पावले टाकत निघाला. इतक्यात त्या प्रेतातील वेताळ त्याला म्हणाला की,राजा निष्काम सेवा करणारा, त्यातून प्राप्त फळाचा विचार कधीच करत नाही.पण तुझ्यासारखे वेळ व्यर्थ दवडून तेच तेच करत बसतात,तेव्हा ह्यांचा जन्म कशासाठी? असा नेमका प्रश्न पडतो.आज तुला एका वनवासीची कथा ऐकवतो.दोन भाऊ लाडाकोडात वाढले.आईवडिलांचा त्यांच्यावर खूप जीव, मोठा खूप प्रेमळ आणि धाकटा मात्र मितभाषी व जेवढ्यास तेवढे बोलणारा.चारचौघात मिसळणाऱ्या मोठ्या मुलाची जो-तो चौकशी करायचा पण धाकटयाला  मात्र हे प्रेम मिळत नव्हते. परोपकारी वृत्ती असलेल्या मोठ्याचा साऱ्