पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आटपा हो झडकरी!

इमेज
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला  वृक्षारोपणाबाबत काही  सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. गडकरी हायवेचे काम 'झडकरी ' पूर्ण करतील अशी अपेक्षा वाटते ती फोल ठरू नये. मुंबई- गोवा महामार्गाचे काम या वर्षअखेरीस पुर्ण होऊन पुढील वर्षी जानेवारीत तो वाहतूकीसाठी पुर्णपणे खुला होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्याने त्यावर भरवसा ठेवण्यास अडचण नाही असे म्हणण्यास हरकत नाही कारण समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची पद्धत व कामाचा उरक वेळेत व्हावा यासाठी धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले मंत्री म्हणून गडकरींची देशभर ख्याती असून याबरोबरच अपयश स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवलेली असल्याने विरोधक त्यांच्यावर फार टीका करण्याचे टाळतात.रामनवमीच्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गाची हवाई  पाहणी करण्याबरोबरच सुमारे 15 हजार कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांची घोषणा त्यांन

त्रिगुणात्मक पुरुषोत्तम!

इमेज
जन्मतःच कुणी कुणाचा अवतार म्हणून प्रसिद्धी पावत नाही तर समोर आलेल्या बिकट प्रसंगावर मात करून घडवलेल्या शौर्यातून अवतारी पुरूष म्हणून मान्यता मिळत असते.अशा महापुरुषांना धर्मबंधनात अडकवून न ठेवता ते समस्त मानव जातीला आदर्श कसे ठरतील हे पाहणे या घडीला महत्वाचे आहे. संयम,मर्यादा,जिद्द आदी त्रिगुणांशी आजन्म एकनिष्ठ राहून अतुलनीय पराक्रमाबरोबरच एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून लौकिक कमावून मानवी रूपातून देवत्वाला अवतारी पुरूष म्हणून पोचण्याचा प्रभू श्रीरामांचा प्रवास सोपा नसला तरी तो आजकाल असाध्य आहे,असे म्हणून दुर्लक्ष करण्याजोगाही नाही. आस्तिक आणि नास्तिक अशा दोन गटात श्रीरामांविषयी मतभिन्नता जरूर असू शकते कारण सरसकट पौराणिक व्यक्तीरेखेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले की,त्यावर विश्लेषण न करण्याची पळवाट आपसूकच उपलब्ध होते पण त्याचवेळेस संत महंत यांच्या अभंगात असलेल्या वर्णनाचे काय, यावर कुणी फारसा विचार करत नाही. श्रीराम हे मर्यादा पुरूषोत्तम ही झाली त्यांची पहिली ओळख पण क्षमाशील,सहिष्णु आणि समानतेचा पाया ठेवून आत्मपरीक्षण करणारा निधर्मी राजा,ही त्यांची पूर्ण ओळख.त्यामुळेच आयुष्यातील कोणत्य

तुम्ही आम्ही का संतापतो?

इमेज
तुम्ही आम्ही का संतापतो? याचे विवेचन करताना उत्तर मिळून गेले की,आजकालच्या समाजात दंगेधोपे,हाणामारी करणे याला डॅशिंग म्हणण्याची वाढती राजकीय रीत व विचारी,विवेकी आणि अभ्यासू असणे म्हणजे बुळचटपणा असा समज रूढ होत चालला असून लहान पोरे वडीलधारी माणसावर खेकसू लागली की त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले,असे समजणारे पालक कमी नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणत सुजाण आततायी वर्तनाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात.पण असे दुर्लक्ष करण्याचा दुसरा अर्थ, समोरचा आपल्याला घाबरतो असा घेऊन आततायीपणा वाढतो आणि मग जशास तसे प्रत्युत्तर देण्याची वेळ येते,त्यातून काहीतरी अघटित घडून मग कायदेशीर यंत्रणा कामाला लागतात. अलिकडे हे प्रकार वाढतच चालले असल्याने या  सा-याचे मूळ असलेल्या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे असून,तुम्ही आम्ही का संतापतो? एरव्ही शांत वाटणारे चेहरे जमदग्नीचा अवतार का धारण करतात?हा विचार करण्यासारखा मुद्दा असून त्याकडे आरोग्य, सभोवतालची परिस्थिती आणि जन्मजात असलेले अवगुण अशा तिहेरी दृष्टिकोनातून पाहिल्यास सविस्तर विवेचन करता येते. मूल जन्माला येते तेव्हापासून ते पूर्णपणे दुष्ट किंवा सुष्टही नसते. त्याल

स्वार्थी जातीचे लोक!

स्वार्थी जातीचे लोक! प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेणे हा अपराध नाही तर त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो,तेव्हा पुर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलो ते दिवस आणि अशा संकटात कुणी असेल तर त्याला होईल तेवढी मदत करण्यास अजिबात विसरता कामा नये. एकदा पैशाची भूक वाढली की गरजा वाढतात आणि त्या पुर्ण करण्याच्या नादात माणसे स्वार्थी व आत्मकेंद्रित बनतात.ज्या मुलाला दोन रुपयाची गरज होती,त्याला ते दिले गेले असते तर त्याचा चांगुलपणावर विश्वास बसला असता पण त्याऐवजी त्याला हडतुड करण्यात आल्याने तो चोरीच्या मार्गाला वळला.                     ..................... विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील प्रेत  खांद्यावर टाकून तो शांतपणे स्मशानातून चालू लागला.इतक्यात त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला की,राजा तुझ्या स्वार्थासाठी तू हे असे उद्योग करत आहेस पण त्यामुळे तू अप्पलपोटा ठरण्याची शक्यता अधिक दिसते आणि एकदा ही सवय जडली की,तुझ्यातील माणुसकी पुर्णपणे मरून जाईल.अशाच एका माणसाची कथा तुला आज ऐकवतो. भाग्येश नावाप्रमाणेच भाग्यवान  होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा

अधिवेशन काय कामाचे?

इमेज
संसद असो की विधिमंडळ तेथे इतका गोंधळ आणि बेशिस्त दिसते की,बालवाडीत जाणारी मुले त्यापेक्षा कितीतरी शिस्तबद्ध आणि विचारशक्तीचे वय नसतानाही काहीतरी करण्याचे ध्येय ठेवून असल्यागत वर्गात येतात.दुस-याचे अनुकरण करून रडणारे मूलही हौसेने बालवाडीत जाऊ लागते.अधिवेशन युगानुयुगे चालत आलेले आहे पण तेव्हाच्या अभ्यासू आणि विद्वान सदस्यांचे किंवा मंत्र्याचे अनुकरण विद्यमान सत्ताधारी,विरोधक कुणीच करताना दिसत नाही, त्यामुळे बदलच होणार नसेल तर असे अधिवेशन काय कामाचे?असा प्रश्न सामान्यजनास पडतो आणि त्याचे उत्तर कुणाकडेच नाही. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकदाचे संपले.  जवळपास महिनाभर चाललेल्या या अधिवेशनाचे बरेचसे कामकाजाचे तास वाया गेले आणि फक्त 17 विधेयके मंजूर झाली.आता कामकाजाचे तास वाया जाण्यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकाकडे बोट दाखवतील तो भाग निराळा पण अधिवेशनात महागाई,रस्ते,पाणी,वीज,शेतकरी आत्महत्या,अवकाळी पावसाचे वाढते संकट हे मुद्दे घेऊन फक्त विरोधकांनी सभात्याग करायचा व सत्ताधाऱ्यांनी मोघम उत्तर द्यायचे, हा मागील बऱ्याच वर्षापासून चालत आलेला  सोयीस्कर खेळ यावेळेसही पहावयास मिळाला. अर्थसंकल्पी

Political blog

इमेज
  कारभारी दमानं.... राहुल गांधी यांच्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना त्याचा अवलंब करायचे सोडून पक्षजनांचे आंदोलन कशासाठी?असा प्रश्न असून काँग्रेससारख्या विचाराने चालणाऱ्या पक्षाला यातून राजकीय लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. कपिल सिब्बल, सिंघवी असे कायदेपंडीत सोबत असताना ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणे अधिक योग्य ठरू शकते. निवडणूका दृष्टीपथात असताना पक्षाला पूर्णवेळ वाहून घेऊन पक्षबांधणी करण्याचे सोडून भारत जोडो यात्रा करून थकलेले  सदगृहस्थ राहुल गांधी काही बदलायचे  नाव काढत नाहीत.देशाला काँग्रेसची गरज असताना आपले विचार आणि सरकारचे अपयश व जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य अविरतपणे करण्याचे सोडून फक्त घराणेशाही टाळली असे कागदोपत्री दाखवून मल्लिकार्जुन खरगेंच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून राहुल गांधी नसते उपद्व्याप करतानाच अधिक दिसत आहेत. दिल्लीतले दोन शक्तीशाली नेते आणि राहुल गांधी यांनी एकमेकांना मोठे करण्याची सुपारी घेतलेय की कसे, काही कळत नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की,त्यांची कबर खोदण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे...आता एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याचा असा अवमान

Blog on MNS

इमेज
  संघर्षाची सतरा वर्षे!  पक्ष कोणताही असो,त्याला आपल्याला सत्ता मिळावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे पण त्या मार्गाने वाटचाल करताना  उत्तम वक्तृत्व शैलीबरोबरच उपलब्ध संधी,गरजेनुसार तडजोड आणि आकड्यांचे गणित यातही पारंगत असणे आवश्यक असते.सामान्यजन याला लबाडी म्हणतात तर राजकीय भाषेत त्याला चतुराई म्हणतात. राज यांच्यासारख्या परखड नेत्याला हे जमेल का? हे महत्त्वाचे आहे. मा झे स्वतःचे काहीतरी आहे, मी स्वतः काहीतरी निर्माण केले आणि मी कुणाच्या पुण्याईवर जगत नाही हे सांगताना वाटणारा अभिमान त्या व्यक्तीच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केली तरी थोड्याबहुत प्रमाणात जाणवतो.राज ठाकरे यांची मनसे आता सतरा वर्षांची झाली, हा सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण संघर्षातच गेला. संघर्षाशिवाय सत्ता मिळत नाही आणि जनतेच्या समस्या आंदोलनाशिवाय सुटत नाहीत पण नुसती आंदोलने करत राहण्यासाठी पक्षाचा जन्म कुणालाच परवडणारा नाही. शिवाय कार्यकर्ते तरी किती केसेस अंगावर झेलतील? हा प्रश्न असतो.अशावेळेस पक्षाच्या मुख्य  नेत्यालाच आपली पुढची दिशा ठरवावी लागते. हे लक्षात घेता सध्याची राजकीय परिस्थिती मनसेला अनुकूल आहे का? याचे उत्तर श

Gudhipadwa blog

इमेज
  पाडवा गोड होतोय ... पाडव्याचे दुपारचे जेवण तयार झाल्यावर सुरूवातीला का...का...का... करून  ठेवलेल्या वाडीसाठी घरातील कर्ता पुरूष कावळयांना साद घालत असे. मग कावळ्यांची झुंब्बड उडायची आणि वाडी घेऊन पूर्वज समाधानी होत असत. त्याकाळात बिनधास्त पिणारी मंडळी असल्याने तोंडाची वाफ दवडण्याइतपत वाद व्हायचे.रात्री मांडावर नमन होत असे.प्रत्येक गावात पाडव्याच्या रात्री मृदंगावर थाप मारून नव्या वर्षाची सुरुवात केली जायची. गु ढीपाडवा...मराठी नववर्षाची सुरूवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त...या सणाची धार्मिक पार्श्वभूमी सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज वाटत नाही.अशा विविध सणांच्या माध्यमातून शेअर बाजार तेजीत येण्याबरोबरच आर्थिक उलाढाल वाढल्यास त्याचे आणखी अनुकूल परिणाम भविष्यात दिसू शकतात. यासारख्या अनेक अपेक्षांच्या आणि आठवणींच्या गुढ्या उभ्या राहिल्या की मन भूतकाळात रमते व एकेक करून  विविध घटना डोळ्यासमोरून सरकत जातात...शिमगा, पाडवा हे सण खरे म्हणाल तर उत्साहाचे, पण त्याचवेळेस वार्षिक परीक्षा डोके वर काढतात आणि एकीकडे आनंद व दुसरीकडे टेन्शन अशी दुहेरी अवस्था विद्यार्थी

Political rallies blog

इमेज
  सभा जाहल्या उदंड!  कोकणातच नव्हे तर राज्यात कुठेही सर्वपक्षीय राजकीय  सभांचा शिमगा निवडणुका नसतानाही सुरू राहिला तर सामान्य मतदार उबगणार आणि त्यातून निरुत्साही मतदार मतदानाकडे पाठ फिरवणार,त्याला जबाबदार कोण? यावर आतापासूनच गंभीरपणे विचार करण्याची गरज असून निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विनाकारण सभा घेऊन सामान्यांचे डोके उठवण्यापासून रोखले पाहिजे . अवकाळी पावसाचा धमाका राज्यात सुरू असतानाच राजकीय नेते तरी त्यात कमी कसे पडतील?ऐन शिमग्यात सणासुदीचा विचार खुंटीला टांगून कोकणात  कुणी शिवगर्जना तर कुणी उत्तर सभा घेऊन आरोप- प्रत्यारोप करत सुटले.आपापले समर्थक विविध भागातून जमा करून शक्तिप्रदर्शन करताना कोकणवासियांचा आपल्यालाच कसा आशीर्वाद हे तावातावाने सांगण्यात आले पण सत्य हे आहे की,सामान्य कोकणी माणसाला यापैकी कुणामध्ये काहीही स्वारस्य उरलेले नाही.'रात्रंदिन आम्हा पोटापाण्याचा विचार...पुरेसा पैसा हाती येईना..'अशी कोकणातल्या राबत्या हातांची अवस्था असताना, त्याचे भान ठेवून निदान आजवर ज्या कोकणने भरभरून दिले त्या कोकणी माणसाला किंवा अडचणीत असलेल्या राज्यातील बळीराजाला, सभेसाठी नाहक उ

Blog on girls dispute

इमेज
 ...खूपच प्रगती झाली !  पुरुषांच्या तुलनेत सोशिक समजदार असलेल्या महिला पूर्वीच्या तुलनेत पुढे जाण्याच्या संधी असताना किंवा असला वाईट विचारही मनात आणू शकत नाहीत अशी ख्याती असताना व ज्यांची  निर्मिती दया, क्षमा, शांती व प्रेमासाठी झाली असताना त्या महिला  बदलत्या जमान्यात इतक्या क्रूरपणाचे प्रतिक का होऊ लागल्यात? हे जसे प्रश्न आहेत अगदी तसेच विचार करण्यासारखा मुद्दा हा ठरतो की, एखाद्या घटकाला सवलती दिल्या की सुधारणेबरोबरच तो शेफारूही शकतो आणि तसे होत असेल तर मग काय  करायचे? उत्तरही शक्य तितक्या लवकर शोधायला हवे.  स माजात समानता आणायची असेल  तर प्रत्येक घटकाला समान न्याय मिळणे आवश्यकअसते  आणि साऱ्यांच्या योगदानाशिवाय हे  शक्य नसल्याने विविध घटकांना जोखंडातून मुक्त करण्यासाठी चळवळी सुरु झाल्या या चळवळींना कायद्याने बळकटी आली.मात्र हे करताना त्यातून ज्या घटकांना बळकटी मिळाली त्यातील काही घटक माजुरडेपणा दाखवू लागलेत की काय, असा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे.   नुकताच महिला दिन साजरा झाला. पुरुष प्रधान संस्कृतीने महिलांना स्वातंत्र्य  नव्हते असा एक काळ होता, आता त्यात पूर्ण सुधारणा झालेय

Blog on H3N2

इमेज
  बदलत्या ऋतुचक्रातील पीडा! भारतात एनफ्लूएन्झा एच3एन2 विषाणूच्या तडाख्यात सापडल्याने हरियाणा व केरळमध्ये 2 रुग्ण दगावल्याची माहिती मिळाली आणि नीती आयोगाने मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसे पाहिले तर गर्दी किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरा असे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसावी पण त्याचप्रमाणे मास्क वापरला म्हणजे साथ टळली असे मानणेही चुकीचे आहे.  एनफ्लूएन्झाच्या ए प्रकाराविषयी आणि त्यात मूळ विषाणू आहे एच1एन1 आणि त्याचा उपप्रकार एच3एन2 हा आहे. त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण अशा प्रकारची साथ आपल्याकडे नेहमीच उद्भवते पण यावेळी ऑक्टोबरपासून अचानक पाऊस जाणे, त्यानंतर कमालीचा उकाडा होणे, मध्येच थंडी पडणे व ढगाळ हवामान होणे असे चमत्कारिक वातावरण होते. त्यामुळे या विषाणूला जोर धरण्यासाठी ते पोषक ठरले आणि सध्याची परिस्थिती उद्भवली. को रोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जरा कुठे मोकळा श्वास घेण्यास नागरिकांनी सुरुवात केली तर त्यात एनफ्लूएन्झाच्या उपप्रकाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून कोरोनाच्या महामारीचा मुकाबला केल्यानंतरही आपण त्यातून काहीच धडा घेतलेला नाही हेच आता दिसून आ
इमेज
देवेंद्रपंतांचे पंचामृत! प्रथम पायाभूत सुविधा विस्तारीत करणे किंवा सेवा क्षेत्राची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. आरोग्य, वाहतूक, शैक्षणिक अशा क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा लाभ सरकारला हमखास मिळत असतो. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न बजेटमध्ये दिसतात ते स्वागत करण्यासारखेच आहे. मात्र असे असले तरी काही बाबी खटकणाऱ्याही आहेत. राज्याचे उत्पन्न आणि डोक्यावर असलेला कर्जाचा भार याचा विचार अर्थमंत्र्यांनी केलेला दिसत नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेसा वाव आहे कारण देऊ केलेल्या सवलतींचा तिजोरीवर पडणारा भुर्दंड आणि तो भागवण्यासाठी करावी लागणारी आर्थिक कसरत कशी पुर्ण करणार याचे उत्तर मिळत नाही. अ र्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प कसा सादर करावा, त्यांचे अर्थसंकल्पीय  भाषण कसे असावे याचे विवेचन आमदार असताना आपल्या पुस्तकात करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अर्थ खात्यासह विविध महत्त्वाच्या खात्याचे कारभारी असून मागील अनेक वर्षांची बजेट पेश करण्याची त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली. कोरोनाच्या भीषण आपत्तीतून सावरत असलेल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न क
इमेज
होळीची वेताळकथा! होळी जर देवाच्या नावाने साजरी केली जात असेल, त्यासाठी झाडे तोडली जात असतील  आणि देवाने हे विश्व निर्माण केले असेल तर मग त्या विश्वाचा पर्यावरणपूरक महत्त्वाचा  घटक असलेले वृक्ष तोडलेले देव कसा खपवून घेतो? ... या प्रश्नाचे उत्तर तू माहीत असूनही दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील...वेताळाच्या या प्रश्नावर विक्रमादित्याने शांतपणे उत्तर देण्यास सुरूवात केली वि क्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीप्रमाणे झाडावरील प्रेत खांद्यावर घेऊन तो शांतपणे मंद पावले टाकत स्मशानातून निघाला. तेव्हा त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला, राजा मला एक कळत नाही की जे साध्य होणार नाही ते पुन्हा पुन्हा करण्याचा अट्टहास तू का करत आहेस? माणसाच्या अंगी अहंकार,लोभ,बेजबाबदारपणा  आणि स्वार्थी वृत्ती बळावली की  त्याची वाटचाल ऱ्हासाकडे चाललेय हे समजून जावे. आपण स्वतः जगताना भूतलावरील इतर जीवानाही जगण्याचा हक्क आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.अशीच एका संपन्न भूमीची वाळवंटाकडे सुरु असलेल्या वाटचालीची गोष्ट आज तुला सांगतो.  परशुराम भूमी तशी निसर्गसंपन्न आणि विद्वा
इमेज
 आठवणीतील शिमगोत्सव  शिमगोत्सवाची प्रत्येक गावची परंपरा आणि रूढी वेगवेगळ्या आहेत. पण तरीही झांजये ,टिपरी आणि डफये असे खेळे आढळतात. प्रत्येकाची गाणी आणि नाचण्याची पद्धत वेगळी असल्याने ते पाहण्यास खूप मजा येते. शिव ...पार्वती.. गजानना .., सीतामाय बोलते रामा ओ भरतारा ..एवढा मृग मारावा माझ्या ओ चोळीला, ही झानजी वाजवणाऱ्या खेळ्यांची गाणी असत. तर ये ग ये ग विठाबाई , संत तुकाराम भक्त संत तुकाराम, प्रिय अमुचा देव प्रिय अमुचा, यासारखी गाणी म्हणत टिपरी खेळे पेरणी लावून नाचू लागले की तो खेळ पाहण्यास खूप मजा येत असे. डफये  खेळे  याहून वेगळे आणि त्यांची वेशभूषा इतकी झक्कास की  ती डोळे मिटल्यावरही समोर दिसावी आणि गाणी तर लाजवाब कारण त्यात  प्रश्नोत्तरे असतात.जसे की, पांडवांचे  घरी मांडिले  सहस्रभोजन .देशोदेशीचे राजे निघाले होते कोण कोण? अशी काही गाणी आहेत.   को कणात शिमगोत्सवाची धामधूम सुरु झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कोकणी माणूस तसा पहिला तर  उत्सवप्रिय, त्यामुळे प्रत्येक सण साजरा करण्यास तो कमी पडणे शक्यच नाही.बदलत्या काळानुसार आता उत्सवांचे स्वरूप बदलत चालले आहे आणि वाढत्या वयानुसार बद