पोस्ट्स

न्यायामागील अन्याय!

इमेज
शेवटी इतका काथ्याकूट करून साध्य झाले काय?ठाकरेंना अपेक्षित न्याय मिळाला का?  हा प्रश्‍न निरुत्तरीतच राहतो. तीनचार मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कोर्टाने मांडले अगदी घटनापिठाकडे काही मुद्दे सोपवले इतपत ठीक पण या साऱ्यात शिंदे सरकार वाचले त्याचे काय? इतके कडक ताशेरे ओढूनही सरकार वाचले या आनंदात शिंदेंच्या समर्थकांनी राज्यभर पेढे वाटून आनंद साजरा केला. काहीवेळा ईप्सित साध्य करण्यासाठी पदरी पडलेले  क्षणिक नकारात्मक भाष्य दुर्लक्षित करणे कसे फायद्याचे असते हे मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलेच उमगलेले दिसते. उशीरा दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखा जसा असतो अगदी तसेच समोर असलेली परिस्थिती कायद्याच्या चौकटीत बसत नाही हे दिसत असतानाही काही करता येत नसेल आणि परिस्थिती जैसे थे राहणार असेल तर तेसुद्धा न्याय नाकारण्यासारखेच ठरते. मग त्याला कितीही ताशेऱ्यांचे कंगोरे असोत की, कुणावरील शेरेबाजी असो त्याला फारसा अर्थ न्यायासाठी दारी आलेल्याच्या दृष्टीने राहत नाही. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने काही निरीक्षणे नोंदवली व अनेक निर्णय...

टाका पुढचे पाऊल!

इमेज
कोकणात कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला ज्या पद्धतीने टोकाचा विरोध वेगाने होतो त्या तुलनेत सर्वसमावेशक व मोकळेपणाने चर्चा होण्याचे प्रमाण खूपच कमी असते व त्यामुळे नेमके वास्तव काय हे त्या त्या भागातील सामान्यांना कळत नाही. रिफायनरी सारखे प्रकल्प प्रेरणादायी ठरू शकतात आणि त्यामुळेच फक्त विरोधास विरोध म्हणून अशी कोणतीही टोकाची भूमिका न ठेवता रिफायनरीबाबत सविस्तर चर्चा करून, लाठीकाठीचे धोरण न अवलंबता, स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्याचे धोरण ठेवले पाहिजे. कोकणात कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला ज्या पद्धतीने टोकाचा विरोध वेगाने होतो त्या तुलनेत सर्वसमावेशक व मोकळेपणाने चर्चा होण्याचे प्रमाण खूपच कमी असते व त्यामुळे नेमके वास्तव काय हे त्या त्या भागातील सामान्यांना कळत नाही आणि सर्वच प्रकल्प नकारात्मकतेच्या तराजूत तोलले जातात व त्यांना सरसकट विरोध करत हुसकावण्याची सवय कोकणवासियांच्या अंगी भिनत चालल्यासारखे दिसते. बारसू रिफायनरीवरून सध्या तापलेले वातावरण हा त्यातलाच एक भाग आहे. रिफायनरी प्रकल्प विनाशकारी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कोकणातील आंबा व इतर पि...

आपेशाचा धनी कामगार!

इमेज
  मुकेश अंबानीनी कर्मचाऱ्याला घर न देता, संस्था अडचणीत  (नसली तरीसुद्धा) कशी आहे आणि आपण असेच राहिलो तर मरून जावू .मनोजजी, आपल्याला जोर करावा लागेल असे मिळमिळीत राहून नाही चालणार.त्या एअर टेलने पुन्हा एअरमध्ये (हवेत)आपली टेल (शेपटी)हलवण्यास सुरूवात केलेय,ध्यानात येत नाही का तुमच्या?इकडे आमचे बंधुराज अडचणीत आहेत.पोरापोरींची लग्न करून दिली..मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये डब्यात चाललाय, आता पैसा पुरवायचा कुठे आणि आणायचा कुठून? रात्ररात्र झोप लागत नाही.आता मिसेसला बोललो, रोज बाजारात जावून भाजी आण आणि साधाच काय तो स्वयंपाक कर. आपल्याला आता स्वयंपाकी आणि घरकामगार ठेवण्याची चैन नाही परवडणार..मीसुद्धा व्यायाम म्हणून इतर कामे करत जाईन.कोणत्याही कामात कमीपणा नसतो, अशी रड लावण्याची गरज होती जेणेकरून देशातील इतर उद्योजकांना एक नवा डायलॉग मिळाला असता मंदीच्या काळात पगारवाढ तर सोडाच पण कामगाराच्या पेकाटात लाथ घालून हाकलून देणारे जालीम मालक उदंड झालेले असतानाच,कामगारांमुळे आपली उद्योगसंस्था वाटचाल करतेय. त्यांचे योगदान नाकारता येत नाही,त्याबदल्यात आपण त्यांना देत असलेला पगार पुरेसा आहे का किंवा ...

भगवंताची पन्नाशी!

इमेज
  सचिन तेंडुलकरचे महानपण त्याच्या खेळाइतकेच विनम्रतेतही दडलेले आहे.तसे क्रिकेटमध्ये खूप खेळाडू त्यांच्या सुरेख खेळासाठी प्रसिद्ध होते पण  डाव रंगलेला असताना मध्येच नव्वदीत बाद होणे भलेही तो उतावीळपणाचा का एक भाग असेना पण सचिनला सहानुभुतीच देऊन गेला.पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद ठरवणे आणि सचिनने गुमान निघून जाणे,अशावेळेस चाहते मैदानाबाहेरून त्या पंचाला कडकडून शिव्या देत असत. समर्पण,जिद्द,कौशल्य आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठीची धडपड,मेहनतीची तयारी असलेला सामान्य कुटुंबातील माणूसही  त्याने निवडलेल्या क्षेत्रात  उच्च स्थानी पोचून  जितीजागती  दंतकथा ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण  म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर.सत्तरीच्या दशकात गरीबी हटावच्या घोषणा देशात दिल्या जात होत्या.त्या काळात जन्मलेले हे बालक गो-या साहेबाच्या क्रिकेटमध्ये त्यांच्याही कितीतरी वरच्यास्थानी पोचेल असे त्यावेळी कुणीच गृहीत धरले नव्हते. क्रिकेटचा भगवंत असलेला सचिन तेंडुलकर आता पन्नाशीचा झाला. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण तीन टप्प्यांत करावे लागेल.बालकांड,मैदानकांड आणि आता सुरू अ...

'प्रवास नको पण बस आवर!

इमेज
पहिली गाडी बिघडली म्हणून दुस-या गाडीची वाट बघताना त्यावेळी ती बस आलीच नाही शेवटी दुपारी उन्हातून चालत घर गाठावे लागले.'प्रवास नको पण बस आवर 'अशी नवी म्हण त्यावेळीच सुचली होती.  बरे प्रवासात  इतर सर्व नीट घडून आले तरी सीटवर तुमच्या शेजारी कोण बसेल आणि त्याला काय छंद असेल काही सांगता येत नाही.बससीटवर आणि ब्लॉकमध्ये रहायचे असेल तर पैसे देऊन जोडीला संयमही ठेवावा लागतो कारण तुमचा शेजारी कोण? हे ठरवण्याचा तेथे तुम्हाला अजिबात अधिकार नसतो.    प्रवासाची  मला तशी मनापासून आवड पण तो झाला पुर्वीचा एक काळ. आता परिस्थिती अशी आहे की मी  प्रवासापासूनच काय पण कारण नसताना कुणाकडे जाण्यापासूनही दूर राहतो. आता येथे एक स्पष्ट करावे लागेल की, आपल्या मनात कुणाविषयी आकस किंवा दुजाभाव नाही. मात्र आजवर आलेल्या अनुभवातून काही बंधने स्वतःच स्वतःवर लादली तर  ती फायदेशीर ठरतात म्हणण्यापेक्षा डोक्याला ताप होत नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी मला माझे काही संभाव्य शत्रू कितपत प्रबळ आहेत ते  शोधावे लागते.कारण काळ आणि वेळ कधी येईल याचा काही  नेम नसतो म्हणण्यापेक्षा ती येतेच आणि...

असुनि डोळे आम्ही आंधळे

इमेज
  माझ्या खिशात इंदिराजींच्या काँग्रेसचा हात आणि जनता पार्टीचा नांगरधारी शेतकरी असे दोन परस्पर विरोधी पक्षाचे बिल्ले एकत्र नांदत होते. तसे ते मतदान केंद्रावर क्षम्य नव्हते पण ते बिल्ले काढले असते तर मी आणखी जोरात रडलो असतो हे आधीच समजून पोलिसाने त्याला महत्व दिले नाही. राजकारण आणि निवडणुका याचा उबग आजकाल सामान्यांना  येत असतो हे जरी खरी असले तरी १९८०-९० च्या दशकात निवडणूका कशा असायच्या आणि त्यावेळी काय केले जायचे हे सर्व राजकारण बाजूला ठेऊन जाणून घेण्यास काही हरकत  नसावी असे वाटते. ८० ते ९० च्या दशकातील राजकारण हे वैचारिकतेवर अधिक चालत असे. आपल्या विरोधी पक्षाच्या धोरणावर टीका करून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण  करत असत. आजच्यासारखी व्यक्तिगत टीका किंवा कुणाची बदनामी त्याकाळात होत नसे. मुळात निवडणूकांची संख्या तशी मर्यादित आणि प्रचार सभाही मर्यादित होत्या.नाही म्हणायला लाऊडस्पीकरवरून गावात फिरता प्रचार केला जात असे.या घडीला राजकारणाचा जरी तिटकारा वाटत असला तरी बालपणी निवडणूका आल्या की,बरे वाटत असे. त्याला कारण होते ते म्हणजे विविध पक्षांचे बिल्ले आणि प...

घड्याळबाबा

इमेज
  काॅलेजमध्ये तास सुरू असताना मागील बेंचवरून या घडयाळातून टारगट विद्यार्थी आवाज काढत आणि वर्गभर हशा पिकल्यावर शिकवण्यात तल्लीन असलेल्या शिक्षकाचा पारा चढत असे पण हे घड्याळ खिशात दडवले जात असल्याने ते सापडत नसे. वेळेशिवाय घड्याळांचा असाही उपयोग करता येतो, हे विद्यार्थ्यांशिवाय दुसरे कुणालाच उमगणे शक्य नाही.आता मोबाईल आले आणि त्यात घड्याळ व तारीख दिसू लागले,त्यामुळे घड्याळबाबा जरा मागे पडल्यासारखे झालेत पण तरीही घराची भिंत आणि माणसाचा हात याला घड्याळाशिवाय शोभा नाही.शिवाय पुर्वीच्या बालभारतीच्या पुस्तकात उल्लेख  केल्याप्रमाणे त्यांचे काम आजही तेच आहे. घड्याळबाबा हे तसे बालपणापासूनचे म्हटले तर जुने सोबती पण आमच्या घरात यायला त्यांना तसा उशिरच झाला. मात्र १९८० च्या काळात घड्याळ भिंतीवर किंवा हातात नसले म्हणून वेळ कळणार नाही अशी काही कुणाची फार पंचाईत झालेली नव्हती. माणसाने गरजा मर्यादित ठेवल्या म्हणजे असे काही कुणाचे कुणावाचून  अडत नाही.पहिलीत असताना हे घड्याळबाबा बालभारतीत अवतरले पण ते हाती यायला नववी उजाडली. या घड्याळाचे कोणत्याही पक्षाची निशाणी नसल्यापासून खूप मोठे आकर्षण ...

पाण्यासाठी दाहीदिशा!

इमेज
बोरकर बाव ही जलदायिनी दुसरी  गं गाच.अनेकांचे सुकलेले कंठ तिने ओले केले.दमदार झरे असल्याने पंप लावून विहीर कोरडी झाली तरी ती अर्ध्या तासात पुन्हा भरत असे.१४ एप्रिलला बाबासाहेबांच्या ग्रामपंचायतीत असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यायचे. कार्यक्रम आटोपला की ते सर्वजण बोरकर बावीवर पाणी पिण्यासाठी  येत.तेथे पाणी पिऊन ते घरची वाट धरत असत. अशा प्रकारे समानतेचे प्रतिक असलेली बोरकर बाव तहानलेल्यासाठी ख-या अर्थाने गंगामाई होऊन उभी रहायची आणि अजून रहात आहे. 'अन्नासाठी दाहीदिशा....आम्हा फिरविशी जगदीशा' हे जरी कुणी फार वर्षापूर्वी लिहून ठेवले असले तरी त्यात थोडा बदल करून 'पाण्यासाठी दाहीदिशा 'वैगेरे बदल केले म्हणून काही बिघडेल असे वाटत नाही. राज्यात पाणीटंचाईला आयुष्यात एकदाही सामोरा गेलोच नाही असा अनुभव असलेला कदाचित जन्माला येताना तोंडात सोन्याचांदीच्या चमच्यातून   सप्तनद्यांचे गोड पाणीच घेऊन आलेला असायला हवा.कारण पाऊस कितीही पडला तरी मार्चपासून पाणी गायब हे चित्र राज्याच्या अनेक भागात  काही आताचे आहे असे नव्हे.गावागावातले पा...

किती पंचे पंचवीस ?

इमेज
 पहिलीच्या बालभारती पुस्तकात 'जगन घर बघ'पासून ते 'बबन हरीण धर'असे वाक्यांचे सचित्र पाठ असत. आजच्यासारखा वनविभाग आणि प्राणीमित्र तेव्हा इतके सजग नव्हते,नाहीतर हरीण धरायला सांगणा-याला आणि ते सांगकाम्यागत ऐकणा-या बबनवर गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहिले नसते. बालभारतीच्या शेवटच्या पानावर कावळा आणि चिमणीच्या घरट्याची कविता आताही आठवते.'कावळेदादा,कावळेदादा माझा घरटा पाहिलास बाबा? नाही ग बाई चिमु ताई तुझा घरटा कोण नेई? अशी सुरूवात होऊन मग कपिलामावशी,कोंबडी ताई यांना विचारून थकलेल्या चिमणीला पोपट आपल्या पिंजऱ्यात येण्याचे निमंत्रण देतो पण ते नाकारून चिमणी म्हणते,'जळो तुझा पिंजरा मेला...त्याचे नाव नको मला.राहीन मी घरट्याविना...चिमणी उडून गेली राना' अशी ही कविता होती. या कवितेतल्या चिमणीचे,कपिलामावशी आणि कोंबडीचे वंशज आजही दिसतात पण कावळेदादांचे वंशज मात्र पूर्वीसारखे  सापडत नाहीत, ही शोकांतिका झाली आहे. चौथी आणि सातवीच्या परीक्षा झाल्या का?असे कुणीतरी विचारताना दिसले आणि मी बालपणात रमून गेलो.एकेकआठवण डोळे उघडून समोर उभी राहिली. माझ्या बालपणी पहिली ते तिसरी हा काळ...

पाणउताऱ्याची नांदी !

इमेज
चीनला युद्धाची खुमखुमी आहेच पण त्याचवेळेस युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचे वाजलेले तीनतेरा पाहून चीनने आपला पवित्रा बदलला. अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट असल्याने चीनला फक्त अशा कुरघोडी करण्यावर समाधान मानावे लागत आहे. आता चीन हे का करतोय,त्याचे उत्तर साधेसरळ असून भारताचे वाढते प्राबल्य रोखण्यासाठी त्या देशाचे लक्ष विचलित करणे आणि स्वतःच्या देशातील जनतेला ठाऊक असलेले जीनपिंग यांचे अपयश विसरावे, यासाठी असे राष्ट्रवादाचे  बुजगावणे उभे करावे लागते नामकरण विधी हा एक भारतीय संस्कृतीतला मानाचा,उत्साहाचा आणि एखादी संस्थाच असेल तर अभिमानाचा सोहळा असेल पण जे आपले नाही त्याचे नामकरण करण्याचा घाट घालणा-याला 'शी' नाहीतर दुसरे काय म्हणायचे ते आता तुम्हीच सांगा बरे. इतक्या चांगल्या सुरूवातीनंतर ही चर्चा अरुणाचल प्रदेशमधील अकरा गावांचे नामकरण करण्याचा घाट घालणाऱ्या घटनेकडे वळतेय हे अपेक्षित नसले तरी ते मान्य करण्यास काही हरकत नाही.चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि अवघे विश्व म्हणजे चीनच असे समजणारे शी जिनपिंग यांच्यावर आणि त्यांच्या राष्ट्रावर  जगाने इतका अन्याय केल्याची त्यांची भावना आहे की,स्वतःकडील गत...

फडतूस म्हणाले काडतुसला!

इमेज
कोण्या एका जमान्यात पुस्तके, पेन, फाईल्स वैगेरे घेऊन राजकीय नेते दिसायचे. नाही म्हणायला, शरद पवार यांच्याकडे या वयातही हे सर्व दिसते पण बाकी या जमान्यातील मंत्रीमहोदय किंवा नेते यांच्याकडे असे काही दिसत नाही. इतकी सर्व माहिती डोक्यात ठेवण्याइतपत ते हुशार आहेत की कसे ते माहित नाही पण जमाना बदलला आहे एवढे नक्की. आता त्यात आणखी पुढे जाऊन कुणाच्या हाती काडतुस दिसू लागले तर? आणि ते फडतुस म्हणून आणखी कुणाच्या हाती बॉम्ब दिसू लागला तर?... कदाचित ही कल्पना येथे मुर्खपणाची वाटेलही पण ही कल्पनाशक्ती घेऊन एक सुरेख विनोदी नाटक मराठी रंगमंचावर येण्यास हरकत नाही . राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असतानाच राजकीय वातावरण तापले नाही तर नवलच. तसे पाहिले तर राज्यातील राजकीय नेत्यांइतकी सविस्तरपणे बोलण्यासाठीची उसंत इतर कुणाच्याच नशीबी नसेल.त्यामुळे त्यांना रोज काहीतरी नवनवीन सुचत असते. कधी कुणी पक्षी वा प्राण्यांचे आवाज काढतो तर कधी कुणी कुणाच्या नकला करतो, कधी कुणी कुणावर आरोप करतो आणि इतके करूनही पोट भरत नाही म्हणून कुणी कुणाला शिव्या देतो व त्याहीपुढे जावून आता जबाबदार नेतेमंडळी फडतूस आणि काडतुसच्य...

यथा राजा तथा प्रजा!

इमेज
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या या घडीला चिंता करावी इतपत वाढलेली नाही हे सत्य असले तरी या घटनेकडे मागील अनुभव पाहता जरा दक्षतेने सरकारबरोबरच जनतेनेही पहायला हवे आणि त्यामुळेच आपण देशवासियांनी मागील दोन कोरोना लाटांमध्ये काय भोगले याचे स्मरण करणे आवश्यक बनते. संकटातून एकदा धडा मिळाला की त्याकडे अनुभवी नजरेतून पहायला हवे, पण ते संकट टळले की आपण त्यावर सुरेख मात कशी केली,आता आपल्याला सारे जमते आणि आम्ही सा-या जगात बुद्धिवंत अशी स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची सवय झाली की, प्रगती  जशी असंभव अगदी तसेच संकटाची तीव्रता कमी करण्यासाठीच्या यंत्रणाही पुन्हा फाजील आत्मविश्वासात दंग राहण्याची शक्यता अधिक उरते.थोडक्यात यथा राजा तथा प्रजा अशी अवस्था यालाच म्हणतात.या सा-या विवेचनावरून मागील दोन लाटेत देशातील कोट्यावधींना आपल्या तडाख्याने हैराण करणाऱ्या व लक्षावधींचे प्राण घेणाऱ्या कोरोनाने देशात पुन्हा हातपाय पसरण्यास सुरूवात केलेय यावर उजेड टाकण्याचा प्रयत्न असून घाबरण्यालायक  परिस्थिती सध्या दिसत नसली तरी पुन्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अर्थात ही संख्या य...

आहे ते झाले थोडे....

इमेज
गुन्हेगार टोकाचा गुन्हा करतो,पुरावे नष्ट करतो, क्रूरतेची हद्द ओलांडून मोकळा होतो मग अशा गुन्हेगाराला त्याच पद्धतीने तडफडून मरण देणारी सजा दिली गेली तर तो त्याचा अमानुष छळ कसा आणि हे सर्व आताच इतक्या वर्षानंतर घटनाबाह्य वा अमानुष कसे काय वाटू लागले.देशात आजवर स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक कायदेपंडीत,विचारवंत आणि मानवतावादी उदयास आले पण या विषयावर त्यांनी काथ्याकूट केला नाही याचे कारण फाशीची सजा गुन्हेगाराला कोर्ट कधी देते,हे या साऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते तसेच अमानुषतेला मिळणारी सजा त्याच पद्धतीची ठेवली म्हणून लोकशाहीची राजेशाही होण्याची सुतराम शक्यता नाही  गुन्हेगारी कृत्य क्रूरपणा किंवा विकॄतीशिवाय पूर्ण होत नाही.अर्थात प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप वेगळे असले तरी हे प्रकार समाजविघातक आहेत हा त्यातला मुळ मुद्दा असून अशी कृत्ये रोखण्यासाठी वचक ठेवणारा कायदा आणि विनाहस्तक्षेप तपास करणाऱ्या प्रभावी यंत्रणा तसेच खटला सुरू झाल्यावर समोर येणारे पुरावे आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आखून दिलेली शिक्षा वेळेत सुनावणी करून ठोठावली जाणे अपेक्षित असते. अशावेळेस गुन्हेगाराला सजा भोगताना किती वे...

मोठ्याचे काम मोठे!

अक्कलशून्य जसा आपल्याला अविचारी वाटतो तसा त्याच्याकडे असलेला सर्वाना   समान वागणूक देण्याचा गुण आपल्याला दिसत नाही. प्राणी अक्कलशून्य वाटले तरी ते म्हणूनच यशस्वी मायबाप ठरतात जे एकमेकांना त्रास देत नाहीत. मोठ्याने  वनवास स्वीकारला कारण तो आपल्या आईवडिलांना ओळखत होता.पण ज्याला आपले पहिले अपत्य म्हणून जन्म दिला ते अपत्य समाजाला कळले मात्र त्याच्या आईवडिलांना ओळखता आले नाही,हे नवल! विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.नेहमीप्रमाणे झाडावरील प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानातून मंद पावले टाकत निघाला. इतक्यात त्या प्रेतातील वेताळ त्याला म्हणाला की,राजा निष्काम सेवा करणारा, त्यातून प्राप्त फळाचा विचार कधीच करत नाही.पण तुझ्यासारखे वेळ व्यर्थ दवडून तेच तेच करत बसतात,तेव्हा ह्यांचा जन्म कशासाठी? असा नेमका प्रश्न पडतो.आज तुला एका वनवासीची कथा ऐकवतो.दोन भाऊ लाडाकोडात वाढले.आईवडिलांचा त्यांच्यावर खूप जीव, मोठा खूप प्रेमळ आणि धाकटा मात्र मितभाषी व जेवढ्यास तेवढे बोलणारा.चारचौघात मिसळणाऱ्या मोठ्या मुलाची जो-तो चौकशी करायचा पण धाकटयाला  मात्र हे प्रेम मिळत नव्हते. परोपकारी वृत्ती असलेल्या...

आटपा हो झडकरी!

इमेज
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला  वृक्षारोपणाबाबत काही  सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. गडकरी हायवेचे काम 'झडकरी ' पूर्ण करतील अशी अपेक्षा वाटते ती फोल ठरू नये. मुंबई- गोवा महामार्गाचे काम या वर्षअखेरीस पुर्ण होऊन पुढील वर्षी जानेवारीत तो वाहतूकीसाठी पुर्णपणे खुला होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्याने त्यावर भरवसा ठेवण्यास अडचण नाही असे म्हणण्यास हरकत नाही कारण समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची पद्धत व कामाचा उरक वेळेत व्हावा यासाठी धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले मंत्री म्हणून गडकरींची देशभर ख्याती असून याबरोबरच अपयश स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवलेली असल्याने विरोधक त्यांच्यावर फार टीका करण्याचे टाळतात.रामनवमीच्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गाची हवाई  पाहणी करण्याबरोबरच सुमारे 15 हजार कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांची घोषणा ...

त्रिगुणात्मक पुरुषोत्तम!

इमेज
जन्मतःच कुणी कुणाचा अवतार म्हणून प्रसिद्धी पावत नाही तर समोर आलेल्या बिकट प्रसंगावर मात करून घडवलेल्या शौर्यातून अवतारी पुरूष म्हणून मान्यता मिळत असते.अशा महापुरुषांना धर्मबंधनात अडकवून न ठेवता ते समस्त मानव जातीला आदर्श कसे ठरतील हे पाहणे या घडीला महत्वाचे आहे. संयम,मर्यादा,जिद्द आदी त्रिगुणांशी आजन्म एकनिष्ठ राहून अतुलनीय पराक्रमाबरोबरच एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून लौकिक कमावून मानवी रूपातून देवत्वाला अवतारी पुरूष म्हणून पोचण्याचा प्रभू श्रीरामांचा प्रवास सोपा नसला तरी तो आजकाल असाध्य आहे,असे म्हणून दुर्लक्ष करण्याजोगाही नाही. आस्तिक आणि नास्तिक अशा दोन गटात श्रीरामांविषयी मतभिन्नता जरूर असू शकते कारण सरसकट पौराणिक व्यक्तीरेखेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले की,त्यावर विश्लेषण न करण्याची पळवाट आपसूकच उपलब्ध होते पण त्याचवेळेस संत महंत यांच्या अभंगात असलेल्या वर्णनाचे काय, यावर कुणी फारसा विचार करत नाही. श्रीराम हे मर्यादा पुरूषोत्तम ही झाली त्यांची पहिली ओळख पण क्षमाशील,सहिष्णु आणि समानतेचा पाया ठेवून आत्मपरीक्षण करणारा निधर्मी राजा,ही त्यांची पूर्ण ओळख.त्यामुळेच आयुष्यातील कोणत्य...

तुम्ही आम्ही का संतापतो?

इमेज
तुम्ही आम्ही का संतापतो? याचे विवेचन करताना उत्तर मिळून गेले की,आजकालच्या समाजात दंगेधोपे,हाणामारी करणे याला डॅशिंग म्हणण्याची वाढती राजकीय रीत व विचारी,विवेकी आणि अभ्यासू असणे म्हणजे बुळचटपणा असा समज रूढ होत चालला असून लहान पोरे वडीलधारी माणसावर खेकसू लागली की त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले,असे समजणारे पालक कमी नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणत सुजाण आततायी वर्तनाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात.पण असे दुर्लक्ष करण्याचा दुसरा अर्थ, समोरचा आपल्याला घाबरतो असा घेऊन आततायीपणा वाढतो आणि मग जशास तसे प्रत्युत्तर देण्याची वेळ येते,त्यातून काहीतरी अघटित घडून मग कायदेशीर यंत्रणा कामाला लागतात. अलिकडे हे प्रकार वाढतच चालले असल्याने या  सा-याचे मूळ असलेल्या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे असून,तुम्ही आम्ही का संतापतो? एरव्ही शांत वाटणारे चेहरे जमदग्नीचा अवतार का धारण करतात?हा विचार करण्यासारखा मुद्दा असून त्याकडे आरोग्य, सभोवतालची परिस्थिती आणि जन्मजात असलेले अवगुण अशा तिहेरी दृष्टिकोनातून पाहिल्यास सविस्तर विवेचन करता येते. मूल जन्माला येते तेव्हापासून ते पूर्णपणे दुष्ट किंवा सुष्टही नसते. त...

स्वार्थी जातीचे लोक!

स्वार्थी जातीचे लोक! प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेणे हा अपराध नाही तर त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो,तेव्हा पुर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलो ते दिवस आणि अशा संकटात कुणी असेल तर त्याला होईल तेवढी मदत करण्यास अजिबात विसरता कामा नये. एकदा पैशाची भूक वाढली की गरजा वाढतात आणि त्या पुर्ण करण्याच्या नादात माणसे स्वार्थी व आत्मकेंद्रित बनतात.ज्या मुलाला दोन रुपयाची गरज होती,त्याला ते दिले गेले असते तर त्याचा चांगुलपणावर विश्वास बसला असता पण त्याऐवजी त्याला हडतुड करण्यात आल्याने तो चोरीच्या मार्गाला वळला.                     ..................... विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील प्रेत  खांद्यावर टाकून तो शांतपणे स्मशानातून चालू लागला.इतक्यात त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला की,राजा तुझ्या स्वार्थासाठी तू हे असे उद्योग करत आहेस पण त्यामुळे तू अप्पलपोटा ठरण्याची शक्यता अधिक दिसते आणि एकदा ही सवय जडली की,तुझ्यातील माणुसकी पुर्णपणे मरून जाईल.अशाच एका माणसाची कथा तुला आज ऐकवतो. भाग्येश नाव...

अधिवेशन काय कामाचे?

इमेज
संसद असो की विधिमंडळ तेथे इतका गोंधळ आणि बेशिस्त दिसते की,बालवाडीत जाणारी मुले त्यापेक्षा कितीतरी शिस्तबद्ध आणि विचारशक्तीचे वय नसतानाही काहीतरी करण्याचे ध्येय ठेवून असल्यागत वर्गात येतात.दुस-याचे अनुकरण करून रडणारे मूलही हौसेने बालवाडीत जाऊ लागते.अधिवेशन युगानुयुगे चालत आलेले आहे पण तेव्हाच्या अभ्यासू आणि विद्वान सदस्यांचे किंवा मंत्र्याचे अनुकरण विद्यमान सत्ताधारी,विरोधक कुणीच करताना दिसत नाही, त्यामुळे बदलच होणार नसेल तर असे अधिवेशन काय कामाचे?असा प्रश्न सामान्यजनास पडतो आणि त्याचे उत्तर कुणाकडेच नाही. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकदाचे संपले.  जवळपास महिनाभर चाललेल्या या अधिवेशनाचे बरेचसे कामकाजाचे तास वाया गेले आणि फक्त 17 विधेयके मंजूर झाली.आता कामकाजाचे तास वाया जाण्यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकाकडे बोट दाखवतील तो भाग निराळा पण अधिवेशनात महागाई,रस्ते,पाणी,वीज,शेतकरी आत्महत्या,अवकाळी पावसाचे वाढते संकट हे मुद्दे घेऊन फक्त विरोधकांनी सभात्याग करायचा व सत्ताधाऱ्यांनी मोघम उत्तर द्यायचे, हा मागील बऱ्याच वर्षापासून चालत आलेला  सोयीस्कर खेळ यावेळेसही पहावयास मिळाला. अर...